---Advertisement---

यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!!

On: गुरूवार, मे 24, 2018 3:33 PM
---Advertisement---

मुंबई | बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याबरोबर त्याने केलेल्या पराक्रमांची चर्चा झाली तसेच जे विक्रम त्याच्याकडून बाकी राहिले त्याचीही चर्चा झाली.

परंतु क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या खेळाडूंमध्ये एबीच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला आहे. संन्यास घेतलेल्या खेळाडूंमध्ये कसोटी आणि वनडेत ५०ची सरासरी असणारा तो एकमेव खेळाडू आहे.

यापुर्वी असा कारनामा कोणत्याही खेळाडूला जमला नाही. काही खेळाडूंची कसोटी सरासरी ५०च्या पुढे आहे पण वनडे सरासरी कमी आहे. काहींची वनडे सरासरी चांगली आहे परंतु कसोटी सरासरी कमी आहे.

एबी या दोन्ही बाबतीत अव्वल ठरला आहे. त्याने वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा केल्या आहेत तर कसोटीत ११४ सामन्यात ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा केल्या आहेत.

वनडे खेळलेल्या किंवा खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये ३५ खेळाडूंची सरासरी ५०च्या पुढे आहे. यात केवळ विराट, एबी आणि रुट असे खेळाडू आहेत ज्यांची वनडे आणि कसोटी सरासरी ५०च्या पुढे आहे.

कसोटीमध्ये ८५ खेळाडूंनी ५०च्या पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यात हेच तीन खेळाडू सोडले तर कुणालाही दोन्ही प्रकारत ५०च्या पेक्षा जास्त सरासरी राखता आली नाही.

टी२०मध्ये ५०च्या पुढे सरासरी असणारे १३ खेळाडू आहेत. त्यात बाबर आझमची टी२० आणि वनडेतील सरासरी ५०च्या पुढे, मेथ्युव हेडनची कसोटी आणि टी२०मधील सरासरी ५०च्या पुढे आहे तर विराट कोहलीची तिन्ही प्रकारातील सरासरी ५०च्या पुढे आहे.

सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीची कसोटी, वनडे आणि टी२० सरासरी ही ५०च्या पुढे आहे. जो रुटची कसोटी आणि वनडेत सरासरी ५०च्या पुढे आहे तर बाबर आझमची टी२० आणि वनडेतील सरासरी ५०च्या पुढे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-विराट कोहलीच्या काउंटी पदार्पणावर प्रश्नचिन्ह

-कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!

एबी तू पुन्हा ये!

-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत

-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!

-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment