अलीकडेच, माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने एबी डिव्हिलियर्सबद्दल चिंता व्यक्त केली होती की, तो बराच काळ क्रिकेट खेळलेला नाही. अशा परिस्थितीत १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात त्याच्यावर दबाव असेल. गंभीरच्या या विधानामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या चाहत्यांना चिंतेत टाकले होते.
पण त्यानंतर लगेचच डिव्हिलियर्सने आरसीबीच्या सराव सामन्यात दाखवून दिले की, गोलंदाजांना फोडून काढण्यासाठी त्याला जास्त सरावाची गरज नाही, फक्त हातात बॅट पुरेशी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पहिल्या सराव सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करताना ४६ चेंडूत शतक ठोकले. त्याच्या या कामगिरीमुळे विरोधी संघांमध्येही भीती निर्माण झाली असेल.
डिव्हिलियर्स सुमारे ४ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर सामना खेळत होता. सराव सामन्याच्या एका टप्प्यावर तो १९ चेंडूत १९ धावा करून खेळत होता. त्यानंतर त्याने आपला जुना अंदाज दाखवला आणि ४६ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याच्या या झंझावाती खेळीत त्याने केवळ १० षटकार मारून ६० धावा केल्या याशिवाय त्याने ७ चौकारही मारले.
साल २०११ पासून आरसीबीकडून खेळाणाऱ्या डिव्हिलियर्स व्यतिरिक्त, केएस भारतने ४७ चेंडूत ९५ धावा केल्या, मोहम्मद अझरुद्दीनने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या आणि देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात २१ चेंडूत ३६ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलच्या आरसीबी बी संघाने हर्षल पटेलच्या आरसीबी अ संघाविरुद्ध ७ गडी राखून सामना जिंकला. डिव्हिलियर्सने शेवटचा सामना एप्रिलमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला होता. मात्र, कोरोनामुळे आयपीएल २०२१ पुढे ढकलल्यानंतर तोही आपल्या घरी परतला होता.
Bold Diaries: RCB’s Practice Match
AB de Villiers scores a century, KS Bharat scores 95 as batsmen make merry in the practice match between Devdutt’s 11 and Harshal’s 11.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/izMI4LCSG1
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 15, 2021
सध्या आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत आरसीबी संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे. मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: स्मिथच्या घातक चेंडूने मोडली गेलची बॅट, ‘युनिवर्स बॉस’चेही जशास तसे उत्तर
‘धन्यवाद मलिंगा!’ मुंबई इंडियन्स अशा प्रकारे दिल्या आपल्या ‘चॅम्पियन’ गोलंदाजाला निरोप