येत्या सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१चा थरार रंगणार आहे. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येऊ शकते. तत्पूर्वी जगभरातील काही नामवंत खेळाडू टी-२० लीग स्पर्धेत एकत्र खेळताना दिसून येऊ शकतात. खेळाडू चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात.
मेलबर्नच्या ईस्टर्न क्रिकेट क्लबने सांगितले आहे की ते ब्रायन लारा, युवराज सिंग, एबी डिविलियर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मुलग्रेव क्लबचे अध्यक्ष मालिन पुलेनयेगम यांनी क्रिकेट डॉट कॉम एयूला म्हटले की, “तिलकरत्ने दिलशानसोबत आमचे बोलणे झाले आहे. सनाथ जयसूर्या आणि उपूल थरांगा यांनी देखील होकार दिला आहे. आता आम्ही काही दिग्गज खेळाडूंसोबत संवाद साधत आहोत. आम्ही युवराज सिंग आणि ख्रिस गेलसोबत देखील चर्चा करत आहोत. जवळपास ८० ते ९० टक्के काम झाले आहे.”
या महिन्यात ४ तारखेला मुलग्रेव क्लबने सनथ जयसूर्या यांना मुख्य प्रशिक्षकपदाचा कारभार सोपवला आहे. तसेच मालिन पुलेनयेगम यांनी म्हटले की, “दिलशानने आमचा मार्ग मोकळा केला आहे. ही आमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आम्हाला यावर काम करावे लागेल. आमच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट समजून घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.”
नुकताच दिलशानने मुलग्रेव क्रिकेट क्लबकडून टी -२० क्रिकेट खेळताना १३२ धावा केल्या होत्या. परंतु त्यांच्या संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. (Yuvraj Singh, Ab divilliers and Chris Gayle will play for mulgrave cricke club )
हेरल्ड सनच्या वृत्तानुसार, श्रीलंका संघाचा माजी सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशानने ५१ वर्षीय जयसुर्याला हे पद सांभाळण्यासाठी प्रवृत्त केले होते. तसेच दिलशान आणि उपुल थरांगा हे दोघेही मुलग्रेव क्रिकेट क्लबकडून खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
कडक! फलंदाजाने षटकार खेचण्यासाठी फिरवली बॅट अन् चेंडूने उडवली थेट दांडी