भारतीय क्रिकेट मधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवीन हंगाम सध्या भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. पवन शाह, यश धूल व सरफराज खान या नवोदित खेळाडूंनी चमकदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर आयपीएलमधून नावारूपाला आलेल्या जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समद (Abdul Samad) याने पॉंडेचेरी विरुद्ध तूफानी शतक झळकावून सर्वांची वाहवा मिळवली.
पॉंडेचेरीविरूद्ध आले समदचे वादळ
रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात पॉंडेचेरीविरूद्ध मधल्या फळीत फलंदाजीला येत ६८ चेंडूमध्ये १९ चौकार व २ षटकार ठोकत तडाखेबाज शतक साजरे केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने २०१६ मध्ये झारखंड विरुद्ध खेळताना अवघ्या ४८ चेंडूमध्ये शतक झळकावले होते.
रणजी ट्रॉफीमध्ये वेगवान शतक ठोकणारे फलंदाज
रिषभ पंत ४८ चेंडू वि झारखंड २०१६
अब्दुल समद ६८ चेंडू वि पुद्दुचेरी २०२२
नमन ओझा ६९ चेंडू वि कर्नाटक २०१५
एकलव्य द्विवेदी ७२ चेंडू विरुद्ध रेल्वे २०१५
रिषभ पंत ८२ चेंडू वि झारखंड २०१६
या सामन्याचा विचार केला तर पॉंडेचेरीने प्रथम फलंदाजी करताना पॉंडेचेरीने ३४३ धावा केल्या होत्या. समदच्या १०३ धावांच्या खेळीमुळे जम्मू काश्मीरला पहिल्या डावात आघाडी मिळाली. जम्मू-काश्मीरसाठी कामरान इक्बालनेही ९६ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) पहिल्या डावात तीन बळी मिळवले.
अब्दुल समद हा मागील दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत आहे. अष्टपैलू असलेला अब्दुल आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या याच कौशल्यामुळे सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी त्याला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
विराटने सोडली ‘टीम इंडिया’ची साथ! मालिकेच्या अर्ध्यातून परतला घरी; वाचा सविस्तर (mahasports.in)
क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात मॅट हेन्रीने केली ‘सुवर्णाक्षरी’ कामगिरी (mahasports.in)