---Advertisement---

टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणपदी ‘या’ दिग्गज कोचची लागू शकते वर्णी, द्रविडसोबत केलंय काम

---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होणार आहेत. विराट कोहली आपल्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. याशिवाय प्रशिक्षक रवी शास्त्री देखील आपला कार्यकाळ संपल्याने पायउतार होणार आहेत. यातच भारतीय संघाचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे आणि या कारणास्तव बीसीसीआयने नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. अभय शर्मा या पदासाठी अर्ज करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे.

भारतीय महिला संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा हे भारतीय पुरुष संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतात. अभय शर्मा यांनी भारत अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबतही काम केले आहे. आता ते वरिष्ठ पुरुष संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतात.

अभय शर्मा यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दिल्ली, रेल्वे आणि राजस्थानसाठी एकूण ८९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. त्याचवर्षी, त्यांनी संघासह वेस्ट इंडीज आणि यूएसएचा दौराही केला होता. याशिवाय, त्यांनी भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. अलीकडेच, अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौरने अभय शर्माच्या इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या कामाबद्दल कौतुक केले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांना वगळण्यात आले होते.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, अभय शर्मा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, ‘लवकरच अभय शर्मा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज करू शकतात.’

अभय शर्मा यांना खूप अनुभव आहे. त्यांनी आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये तीन वेळा प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ते भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते. याशिवाय ते भारत अ संघासोबत अनेक वेळा दौऱ्यावर गेले आहेत. ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक देखील राहिले आहेत. याशिवाय त्यांनी राहुल द्रविडसोबतही काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुखापत नडली; टी२० विश्वचषक संघातील हार्दिकची जागा धोक्यात, रोहित शर्माकडून मिळाले संकेत

नामिबियाच्या सांघिक कामगिरीपुढे नेदरलँडची ६ विकेट्सने हारकिरी, टी२० विश्वचषकातून कटला पत्ता!

भारताविरुद्ध २००७ची फायनल खेळणाऱ्या शोएब, हाफिजला मिळणार संधी! पाहा पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---