---Advertisement---

KKR vs LSG: ‘हा’ ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

On: मंगळवार, एप्रिल 8, 2025 7:56 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 21वा सामना आज खेळला गेला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात एलएसीजीने केकेआरचा 4 धावांनी पराभव केला. टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना लखनऊने मर्यादित 20 षटकात 3 गडी गमावून 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरला 234 धावाच करता आल्या. आशाप्रकारे संघाने 4 धावांनी लखनऊच्या नवाबांनी सामना जिंकला.

आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्सने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. एडन मार्क्रम, मिशेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर, एलएसजीने 238 धावांचा मोठा स्कोअर केला होता. एकेकाळी कोलकाताने 13 षटकांत 162 धावा केल्या होत्या आणि संघाला 7 षटकांत जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता होती. व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार रहाणे क्रीजवर असल्याने, केकेआरसाठी हे लक्ष्य खूप सोपे दिसत होते.

मात्र, 13व्या षटकानंतर, केकेआरला पुढील 5 षटकांत फक्त 39 धावा करता आल्या, ज्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक धावगती वाढतच गेली. रिंकू सिंगने शेवटच्या षटकांमध्ये 15 चेंडूत 38 धावांची तुफानी खेळी नक्कीच खेळली आणि डावाच्या शेवटच्या षटकात 19 धावाही केल्या, पण शेवटी केकेआर विजयापासून फक्त 4 धावा दूर राहिला. केकेआरकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 61 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---