भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. तेथे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. प्रमुख खेळाडूंसह ४ राखीव खेळाडू देखील इंग्लंडला जात आहेत. बंगालचा सलामीवीर अभिमन्यु ईस्वरन हा राखीव खेळाडूंपैकी एक आहे. या निवडीनंतर अभिमन्यू अत्यंत खूष दिसला. त्याने आपल्याला या दौर्यातून खूप काही शिकायला मिळणार असल्याचे म्हटले.
या खेळाडूंकडून शिकायला मिळेल
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिमन्यू म्हणाला, ”मी खूप आनंदी आहे. राष्ट्रीय संघात प्रवेश करणे ही अभिमानाची बाब आहे. मला फोन आला तेव्हा मी झोपलो होतो. ही बातमी ऐकून मला धक्का बसला नाही, कारण मला याची अपेक्षा होती. विराट कोहली आणि रोहित शर्मा या सारख्या बड्या खेळाडूंसोबत राहुन खूप काही शिकायला मिळेल.”
आयपीएलमध्ये कोणीही खरेदी केले नव्हते
अभिमन्यु ईस्वरनला आयपीएल २०२१ मध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. यामुळे तो काहीसा निराश झालेला. याबाबत बोलताना तो म्हणाला, “जेव्हा कोणी माझ्यासाठी बोली लावली नाही तेव्हा मला वाईट वाटले. पण दोन महिन्यांनंतर मी भारतीय संघाचा एक भाग आहे. पुढील घरगुती हंगामात मी चांगली कामगिरी करेन आणि आयपीएल २०२२ मध्ये खेळेल.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचला धावांचा डोंगर
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणारा अभिमन्यू ईस्वरन सलामीवीर म्हणून खेळतो. त्याने आत्तापर्यंत ५८ प्रथमश्रेणी सामने खेळताना ४६.९६ च्या सरासरीने ४२२७ धावा फटकावल्या आहेत. त्याने या दरम्यान १३ शतके व १७ अर्धशतके ठोकली आहेत. अभिमन्यूने भारतीय अ संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हनुमा विहारीने टिकेला दिले सडेतोड उत्तर, ट्विट डिलीट करून पळाला ट्रोलर
‘या’ 3 भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दरवाजे झाले कायमचे बंद
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा सनसनाटी आरोप, म्हणाला भारतीय खेळाडू बायोबबलमध्ये