---Advertisement---

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, बीसीसीआयच्या सुत्रांकडून माहिती

On: गुरूवार, डिसेंबर 8, 2022 5:16 PM
Rohit Shamra smashing six
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश संघात दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. क्षेत्ररक्षणाच्यावेळी झेल घेताना रोहितच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित फलंदाजी करणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेे होते. मात्र, रोहितने नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येवून भारताला विजयाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र,आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी रोहितच्याा जागी दुसरा बदली खेळाडू येण्याची शक्यता आहे. भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याला बांगलादेश विरुद्ध 14 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितच्या ऐवजी खेळण्याची संधी मिळू शकते. रोहितच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानेे तो मालिकेतून बाहेर असणार आहे.

बीसीसीआयच्या काही सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, “अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Ishwaran) याने अ दर्जाच्या कसोटी सामन्यात सलग दोन शतके झळकावली. तो बांगलादेशमधील अ दर्जाचा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर चट्टोग्राम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात सामील होईल.” ईश्वरन याने पहिल्या अ दर्जाच्या कसोटी सामन्यात 141 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यात दुसरा दिवस संपण्याच्या आधी 144 धावांवर नाबाद होता. बांगलादेश विरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात शुबमन गिल (Shubman Gill) आणि केएल राहुल (KL Rahul) हा करेेल.

बांगलादेश विरुद्धच्या या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) किंवा उमरान मलिक (Umran Malik) यांच्यापैकी एक खेळाडू दुखापतग्रस्त मालिकेत मोहम्मद शमी याची जागा घेऊ शकतो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर एकही सामना न खेळलेला रवींद्र जडेजा थेट कसोटी सामना खेळणार आहे. अक्षर पटेल आधीच संघात आहे आणि सौरभ कुमार याला बदली खेळाडूच्या रुपात संघात सामील केले जाईल. सूर्यकुमार यादव याने रणजी ट्रॉफीच्या या हंगामात मुंबई संघासाठी खेळण्याची खात्री केली आहे.(Abhimanyu Ishawaran can replace Rohit Sharma in test series against Bangladesh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दात पडले, पण कॅच नाही सोडला! रक्तबंबाळ झाले श्रीलंकन खेळाडूचे तोंड; रुग्णालयात दाखल
रोहित शर्माच्या झुंझार खेळीबदद्ल सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, ट्वीट करत व्यक्त केला आदर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---