सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये(Syed Mushtaq Ali Trophy) आज कर्नाटक विरुद्ध हरियाणा(Haryana vs Karnataka) यांच्या उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटकने 8 विकेट्सने सहज विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथूनने (Abhimanyu Mithun) हॅट्रिक(hat-trick) घेत एका षटकात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
मिथूनने या सामन्यात टाकलेल्या त्याच्या पहिल्या तीन षटकात तब्बल 37 धावा दिल्या होत्या. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने जबरदस्त पुनरागमन करत हॅट्रिकसह चक्क 5 विकेट्स घेतल्या.
यातील चार विकेट्स त्याने 19 व्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर सलग घेतल्या. यात त्याने अनुक्रमे हिमांशू राना(61), राहुल तेवतिया(32), सुमित कुमार(0) आणि अमित मिश्रा(0) यांच्या सगल चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने या षटकातील पुढचा चेंडू वाईड टाकला. तर त्यानंतरच्या चेंडूवर हरियाणाने एक धाव घेतली.
पण पुन्हा मिथूनने या षटकातील शेवटच्या चेंडूवर जयंत यादवला(0) बाद केले आणि हरियाणाला 20 षटकात 8 बाद 194 धावांवर रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
या कामगिरीबरोबरच मिथूनने खास विक्रमही केला आहे. एका गोलंदाजाने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये एका षटकात 5 विकेट्स घेण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली आहे. याआधी बांगलादेशच्या अल अमीन हुसेनने बांगलादेशमधील विक्टरी डे टी20 कप या स्पर्धेत 2013 मध्ये एका षटकात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर मिथूनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून हॅट्रिक घेण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी त्याने 2009मध्ये उत्तरप्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा कर्नाटककडून हॅट्रिक घेतली होती.
त्यानंतर त्याने 2019 ला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच 25 ऑक्टोबरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिळनाडूविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे तो रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी या भारताच्या तीन देशांतर्गत स्पर्धेत हॅट्रिक घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
HAT-TRICK:
Vijay Hazare Trophy final ✅
Syed Mushtaq Ali Trophy semi-final ✅@imAmithun_264 is on a roll.Follow it live 👉👉 https://t.co/fYjNa71y13#HARvKAR @paytm #MushtaqAliT20 pic.twitter.com/jwh3YujEnI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 29, 2019
आज पार पडलेल्या कर्नाटक विरुद्ध हरियाणा सामन्यात हरियाणाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कर्नाटकने 15 षटकातच पूर्ण केला आणि विजय मिळवला. कर्नाटककडून केएल राहुलनने 66 धावांची तर देवदत्त पड्डीकलने 87 धावांची अर्धशतकी खेळी केली.
राहुल द्रविडने आयपीएलमधील संघांना दिला हा महत्त्वाचा सल्ला; म्हणाला…
वाचा👉https://t.co/d5vTgtKIHw👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #IPL #RahulDravid— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
फलंदाजीला जाण्याआधी वॉर्नर, बर्न्स खेळत होते हा खेळ, व्हिडिओ झाला व्हायरल
वाचा👉https://t.co/tWd5y5d0oI👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AUSvsPAK #DavidWarner #JoeBurns— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019