भारतीय टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर अनुभवी फलंदाज अभिनव मुकुंदने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, हार्दिक पंड्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत अक्षर पटेलचा ज्याप्रकारे वापर केला, ते पाहता हार्दिक खूपच गोंधळलेला दिसत होता. अभिनवच्या म्हणण्यानुसार, तिसर्या टी20 सामन्यामध्ये हार्दिकने अक्षर पटेलचा योग्य वापर केला होता.
अक्षर पटेल (Axar Patel) ने दुसऱ्या टी20 सामन्यात एकही षटक टाकले नाही. तो सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळला. पहिल्या टी20 सामन्यात त्याने फक्त दोन षटके टाकली. यानंतर तिसऱ्या टी20 सामन्यात त्याला षटके पूर्ण करण्यासाठी चेंडू सोपवण्यात आला. वेस्ट इंडिजच्या डावातील दहाव्या षटकापर्यंत त्याने त्याचे चार षटके पुर्ण केले होते.
जिओ सिनेमावरील संभाषणादरम्यान अभिनव मुकुंद (Abhinav Mukund) म्हणाला की, “माझ्या मते तिसऱ्या टी20 मध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चे कर्णधारपद उत्कृष्ट सांभाळले. त्याने अक्षरला जिथे गोलंदाजी करायला आवडते तिथे गोलंदाजी करण्यासाठी संधी दिली. अक्षर पटेलला पॉवरप्लेमध्ये आणि पॉवरप्लेनंतर लगेचच गोलंदाजी करायला आवडते. त्यापेक्षा जास्त वेळाने त्याला गोलंदाजी देऊ नये. मला वाटते की अक्षर पटेलचा वापर कसा करायचा याबाबतीत हार्दिक थोडा गोंधळात पडला होता. बरोबरच तो मुकेश कुमारचा चांगला वापर करू शकला नाही.” असेही अभिनव म्हणाला.”
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना 12 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा पराभव केला, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरेल, तर भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मैदानात उतरेल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. (abhinav mukund says hardik pandya was confused about axar patel in 1st tow t20i )
महत्वाच्या बातम्य-
रॉयल लंडन कपमध्ये पुजाराचे दुसरे शतक, टीम इंडियाची मध्यक्रमातील अडचण सुटणार?
“माझ्यासाठी प्रत्येक अपयश ही पुनरागमनाची मजबूत संधी असते” विराटचे लक्षवेधणारे विधान