भारत आणि न्यूझीलंड (T20 Series between india vs new zealand) यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. क्राइस्टचर्च येथे झालेल्या या सामन्यात भारताने 226 धावांचे लक्ष्य 19.4 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 4 गडी राखून जिंकला.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाला वेगवान सुरुवातीची गरज होती. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma & Sanju Samson) आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक फलंदाजी करत केली. दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करत अवघ्या 35 चेंडूंमध्ये त्यांनी पहिल्या खेळाडूसाठी 93 धावांची भागीदारी केली. या शानदार भागीदारीसह दोघांनी भारतीय क्रिकेटमधील एक जुना विक्रमही मोडला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सुरुवातीपासूनच वेगाने धावा करण्यावर भर दिला. मैदानाच्या चारही दिशांना फटके मारत त्यांनी भारतीय संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवली. त्यांच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज यावरून येतो की, भारतीय संघाने चौथ्या षटकातच 50 धावांचा टप्पा गाठला. त्यानंतरही दोघांनी आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि पहिल्या गड्यासाठी 93 धावा जोडल्या.
या कामगिरीसह अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी न्यूझीलंडच्या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावांची सलामीची भागीदारी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा (Rohit Sharma & KL Rahul) आणि केएल राहुल यांच्या नावावर होता. 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात या जोडीने पहिल्या खेळाडूसाठी 89 धावा जोडल्या होत्या. जवळपास सहा वर्षांपासून कायम असलेला हा विक्रम अभिषेक आणि संजू यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मोडला.
न्यूझीलंडच्या मायभूमीवर त्यांच्याविरुद्ध भारतीय सलामीच्या जोड्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमध्येही या भागीदारीचा समावेश झाला आहे. अशा प्रकारे मालिकेतील पहिल्याच सामन्यात अभिषेक आणि संजू यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देतानाच नवा विक्रमही प्रस्थापित केला.
न्यूझीलंडच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची सलामीची भागीदारी करणाऱ्या जोड्या
अॅलेक्स हेल्स आणि मायकेल लम्ब (इंग्लंड) – 143 धावा 2013)
अॅलेक्स हेल्स आणि पथुम निसांका (श्रीलंका) – 121 धावा 2023)
डी’आर्शी शॉर्ट आणि डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 121 धावा 2018)
अहमद शहजाद आणि फखर जमान (पाकिस्तान) – 94 धावा 2018)
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन (भारत) – 93 धावा 2026)





