---Advertisement---

India vs Namibia: अभिषेक शर्मा आता फिट, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज! नामिबिया विरुद्ध खेळणार का?

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 7:12 PM
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आजारी असल्याने टीम इंडियाची चिंता वाढली होती. पण आता भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिषेक आता बरा असून त्याला हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी ही बातमी आल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे, तरीही तो प्रत्यक्ष मैदानात उतरणार की नाही, याचा निर्णय नंतर घेतला जाईल.

टी20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघ गुरुवारी (12 फेब्रुवारी) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या आदल्या दिवशी (बुधवारी) स्टार फलंदाज तिलक वर्माने (Tilak Verma) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, अभिषेक शर्माला बुधवारी डिस्चार्ज मिळाला आहे. पण तो उद्याचा सामना खेळणार की नाही, हे सामन्याच्या दिवशीच ठरवले जाईल. अभिषेकला पोटात संसर्ग (Stomach Infection) झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

भारतीय संघ 12 फेब्रुवारीला नामीबियाविरुद्धचा सामना (India vs Namibia) खेळल्यानंतर कोलंबोला रवाना होईल, जिथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. याबद्दल विचारले असता तिलक वर्मा म्हणाला की, संपूर्ण संघ या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे आणि आम्ही आधीच तयार होतो. जेव्हा पाकिस्तानचा संघ खेळायला तयार असल्याची बातमी मिळाली, तेव्हा आमचा उत्साह अधिकच वाढला.

भारतीय संघाच्या विजयात अभिषेक शर्माचे योगदान महत्त्वाचे आहे. सलामीला येऊन तो ज्या आक्रमक पद्धतीने फलंदाजी करतो, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दबावाखाली येतो. मात्र, अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता, ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने जोरदार खेळी करत संघाला सावरले आणि विजय मिळवून दिला. आता नामीबियाविरुद्धच्या सामन्यात सूर्या अभिषेकला संधी देतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---