भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ली-स्ट्रीट येथे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माकडे (Abhishek Sharma) एक नवीन विक्रम करण्याची संधी आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा भारतीय विक्रम हार्दिक पांड्या (Hardik pandya) (27 षटकार) याच्या नावावर आहे. दुखापतीमुळे हार्दिक या दौऱ्यावर नसल्याने, अभिषेक शर्माकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
अभिषेकने इंग्लंडविरुद्ध केवळ 6 डावांत 22 षटकार मारले आहेत. जर त्याने पहिल्या टी-20 सामन्यात 6 षटकार मारले, तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरेल.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज!
27 : हार्दिक पांड्या
22 : अभिषेक शर्मा
18 : विराट कोहली
तसेच, विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा दोघांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असल्याने ते या शर्यतीत मागे आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 18 तसेच रोहित शर्मानेही 17 षटकार मारले आहेत. तसेच, टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, त्याने 21 सामन्यांत 648 धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, गुरनूर बराड आणि प्रसिद्ध कृष्णा.






