भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केलं. अभिषेक आणि रियान पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असून, ज्युरेलनं यापूर्वी कसोटी पदार्पण केलं होतं.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या वेळी रियान परागच्या वडिलांनी त्याला भारतीय संघाची कॅप दिली. रियान परागचे वडील पराग दास हे आसामचे माजी फर्स्ट क्लास क्रिकेटर आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
झिम्बाब्वे – वेस्ली मधेवेरे, इनोसंट काईया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा
भारत – शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद
अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांनी आयपीएल 2024 मध्ये आपापल्या संघांसाठी चमकदार कामगिरी केली होती. अभिषेकनं सनरायझर्स हैदराबादसाठी 16 सामन्यात 204 च्या तुफानी स्ट्राईक रेटनं 484 धावा केल्या होत्या. तर रियान पराग हा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू होता. त्यानं राजस्थान रॉयल्सचासाठी 15 सामन्यात 52 च्या उत्कृष्ट सरासरीनं 573 धावा केल्या होत्या. याशिवाय, ध्रुव जुरेलनं यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
मात्र या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठीच भारतीय संघात संधी मिळू शकते. तिसऱ्या सामन्यापासून शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन भारतीय संघात सामील होऊ शकतात. ते सध्या भारतात विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. अशा स्थितीत अभिषेक, ध्रुव आणि रियान यांना पहिल्या 2 सामन्यात दमदार कामगिरी करून भारतीय संघात आपलं स्थान पक्कं करावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? समोर आलं मोठं अपडेट
युवा खेळाडूंसाठी मोठी संधी, झिम्बाब्वे दाैऱ्यात लागू शकते चक्क कर्णधार रोहितच्या जागेवर वर्णी
टीम इंडियाच्या विक्ट्री परेडनंतर मुंबईकरांचे हाल, मरीन ड्राइव्हवरून निघाला तब्बल इतके किलो कचरा!