सनरायझर्स हैदराबाद संघाने बुधवारी (27 मार्च) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे पहिल्या 10 षटकात 2 बाद 148 धावा केल्या. हेड आणि अभिषेकने केलेली अर्धशतके विक्रमी ठरले. आयपीएल इतिहासात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी केलेली ही दोन सर्वात वेगवान अर्धशतके आहेत.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान शतक याआधी डेव्हिड वॉर्नर याच्या नावावर होते. वॉर्नरने 20 चेंडूत केकेआर आणि सीएसकेविरुद्ध दोन वेळा ही कामगिरी केली होती. पण बुधवारी (27 मार्च) हैदराबाद संघासाठी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम दोन वेळा मोडला. सलामीवीर ट्रेविस हेड (Travis Head) याने 18 चेंडूत अर्धशतक करत वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला. तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने हेटला विक्रम देखील मोडला. अभिषेकने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. (Abhishek Sharma scored the fastest fifty for Sunrisers Hyderabad)
Fastest 50s for SRH in IPL
16b – Abhishek Sharma vs MI*
18b – Travis Head vs MI*
20b – David Warner vs CSK
20b – David Warner vs KKR
20b – Moises Henriques v RCB#MIvsSRH— Broken Cricket (@BrokenCricket) March 27, 2024
सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारे खेळाडू
अभिषेक शर्मा – 16 चेंडू (विरुद्ध मुंबई इंडियन्स)*
ट्रेविस हेड – 18 चेंडू (विरुद्ध मुंबई इंडियन्स
डेव्हिड वॉर्नर – 20 चेंडू (विरुद्ध केकेआर आणि सीएसके)
मोइसेस हेन्रिक्स – 20 चेंडू (विरुद्ध आरसीबी)
Most runs in first 10 overs in IPL:
148 – SRH v MI, 2024 today
131 – KXIP v SRH, 2014
131 – MI v SRH, 2021
130 – Deccan v MI, 2008
129 – RCB v KXIP, 2016 #SRHvsMI— Bharath Seervi (@SeerviBharath) March 27, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
प्रभावशाली खेळाडू: नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव
मुंबई इंडियन्स : ईशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
प्रभावशाली खेळाडू: डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, विष्णू विनोद
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । मुंबई-हैदराबाद पहिल्या विजयासाठी आमने-सामने, हार्दिकने टॉस जिंकताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल
विराट कोहली गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटपटू, जाणून घ्या रोहित-धोनीचा क्रमांक कितवा?