विराट कोहलीची गणना जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याची मैदानासह आणि मैदानाबाहेरही क्रेझ आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की विराट कोहली या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू आहे? खरंतर, या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्षात आतापर्यंत 64 दशलक्ष युजर्सनं गुगलवर विराट कोहलीला सर्च केलं आहे.
या यादीत महेंद्रसिंह धोनी विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी आतापर्यंत 29 दशलक्ष लोकांनी महेंद्रसिंह धोनीला गुगलवर सर्च केलं आहे. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. या वर्षात आतापर्यंत 28 मिलियन लोकांनी रोहित शर्माला गुगलवर सर्च केलं आहे.
या यादीत विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांची नावे टॉप-3 मध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. परंतु विराट कोहलीच्या तुलनेत महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माला निम्म्या लोकांनीच सर्च केलं आहे. यावरून लोकप्रियतेच्या बाबतीत विराट इतरांपेक्षा तुलनेनं किती पुढे आहे हे कळतं.
आयपीएलच्या या हंगामात विराट कोहलीच्या बॅट मधून चांगल्या धावा निघत आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीनं आयपीएल 2024 च्या पहिल्या 2 सामन्यात 49 च्या उत्कृष्ट सरासरीनं 98 धावा केल्या. त्यानं चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात कोहली धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. मात्र पंजाब किंग्जविरुद्ध त्यानं शानदार पुनरागमन केले. विराट कोहलीनं पंजाब किंग्जविरुद्ध 49 चेंडूत 77 धावा केल्या. या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हंगामातील पहिला विजय नोंदवता आला.
आता बंगळुरूचा पुढील सामना 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. हा सामना आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती
घरी सांगून आला, “पहिल्या चेंडूवर षटकार मारणार”; मैदानावर येताच करून दाखवलं!
वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच





