---Advertisement---

घरी सांगून आला, “पहिल्या चेंडूवर षटकार मारणार”; मैदानावर येताच करून दाखवलं!

---Advertisement---

जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत खेळत असता आणि तुमच्या नावासमोर करोडो रुपयांचा टॅग असतो, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचं दडपण हे आलंच. अशा वेळी भल्या-भल्या खेळाडूंनाही घाम फुटतो. यावर भर म्हणजे, जर तुम्ही फलंदाजीला आला आणि समोर जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक गोलंदाज चेंडू घेऊन उभा असेल, तर तुमच्यावरील दडपणाची कल्पनाही करता येत नाही. मात्र मनात चालू असलेले हे सगळे चढ-उतार बाजूला ठेवून ज्यानं पहिल्याच चेंडूला सीमारेषेपार पाठवण्याचं धाडस दाखवलं त्याला समीर रिझवी म्हणतात!

चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल कारकिर्दीचा पहिला चेंडू समीर रिझवीनं सीमापार टोलावला. समीरनं सीएसकेकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध सहा चेंडूंमध्ये 14 धावांची झटपट खेळी केली. या सहा चेंडूंमध्ये त्यानं सलग दोन चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले.

समीर रिझवी जगासमोर आपल्या प्रतिभेच प्रदर्शन करत असताना, उत्तर प्रदेशात बसलेलं त्याचं कुटुंब टीव्हीवर हा क्षण आनंदानं साजरा करत होतं. समीरच्या प्रत्येक शॉटवर टाळ्यांचा कडकडाट होत होता. मागून घरातील बायकांची कॉमेंट्रीही चालू होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मागून कोणीतरी, समीर पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार असल्याचं बोलून गेला होता, असं सांगताना ऐकू येत आहे. काही वेळातच समीरनं पुढच्या चेंडूवर षटकार खेचला!

 

View this post on Instagram

 

A post shared by Sarfaraz Khan (@cricket_emotion23)

 

चेन्नई सुपर किंग्सनं उत्तर प्रदेशच्या या फलंदाजाला जेव्हापासून 8.4 कोटी रुपयांची किंमत देऊन संघात समाविष्ट केलं, तेव्हापासून तो चर्चेत आहे. प्रत्येकाला त्याची फलंदाजी बघायची होती. जेव्हा शिवम दुबे बाद झाला तेव्हा प्रेक्षक एमएस धोनीला पाहण्याची अपेक्षा करत होते. परंतु रिझवी मैदानात आला. या युवा फलंदाजानं आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर दिग्गज गोलंदाज राशिद खानला षटकार खेचून येताच प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला. त्याच षटकात त्यानं आणखी एक षटकार मारून चेन्नईनं चुकीच्या खेळाडूवर पैसे लावले नसल्याचं दाखवून दिलं!

महत्त्वाच्या बातम्या-

वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच

पहिल्याच चेंडूवर षटकार, राशिद खानलाही चोपलं! चेन्नईच्या 8.4 कोटींच्या खेळाडूची फलंदाजी पाहून धोनीही हैराण

धोनी इफेक्ट! चेन्नईमध्ये येताच पालटलं शिवम दुबेचं नशीब, आकडेवारी पाहून व्हाल थक्क

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---