---Advertisement---

BAN vs PAK: बाबर आझम पुन्हा ढेपाळला, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला

On: शनिवार, ऑगस्ट 31, 2024 7:32 PM
---Advertisement---

सध्या बांगलादेशचा पाकिस्तान दौरा सुरु आहे. त्यामध्ये पहिल्याच कसोटी सामन्यात रावलपिंडीच्या मैदानावर बांगलादेशनं पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात स्टार खेळाडू बाबर आझम (Babar Azam) शून्यावर बाद झाला होता. तत्पूर्वी दोन्ही संघामधील दुसरा कसोटी सामना रावलपिंडी मैदानावर रंगला आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात बाबर आझम (Babar Azam) 31 धावा करुन बाद झाला. त्यामुळे तो सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल होत आहे.

वास्तविक, बाबर पाकिस्तानसाठी पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दरम्यान त्यानं 77 चेंडूंचा सामना करत 31 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 2 चौकार लगावले. त्यानंतर त्याला फिरकीपटू शाकीब अल हससनं एलबीडब्ल्यू बाद केले. बाबर सतत खराब फॉर्मशी झुंजत देत आहे. या कारणामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला. दरम्यान एक्सवरील एका युजरकर्त्यानं बाबर आझमच्या (Babar Azam) निवृत्तीची मागणी केली.

बाबर आझमला (Babar Azam) गेल्या 15 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बाबर शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात 31 धावा करून तो बाद झाला. बाबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धही खास कामगिरी करता आली नव्हती. डिसेंबर 2023 मध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 21 धावा आणि दुसऱ्या डावात 14 धावा केल्यानंतर तो बाद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Champion’s Trophy: हरभजन सिंगचे बदलले मत, आता म्हणाला, “भारताने पाकिस्तानमध्ये…”
VIDEO; बाऊन्सरच्या फटक्यात कोसळला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू
धोनी, कोहली नाही ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक! जाॅन्टी रोड्सचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---