---Advertisement---

आगामी आयपीएलसाठी सनरायझर्सचा मोठा ‘गेमप्लॅन’! ‘हा’ अष्टपैलू उतरणार सलामीला

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 7:12 PM
srh
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव नुकताच बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात सर्व संघांनी आपल्या संघाची बांधणी केली. २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या लिलावात अनेक शानदार खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले. आता या लिलावानंतर संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी आगामी आयपीएलच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

हे असणार संघाचे सलामीवीर

आगामी आयपीएलचा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस सुरू होईल. या आयपीएलआधी सनरायझर्स हैदराबाद संघाचे फिरकी गोलंदाजी सल्लागार मुथय्या मुरलीधरन यांनी आगामी हंगामात संघाचे सलामीवीर कोण असतील याबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले,

“आयपीएल २०२२ मध्ये आम्ही कर्णधार केन विलियम्सन व अष्टपैलू अभिषेक शर्मा यांच्यासह सलामी देणार आहोत. मागील दोन वर्षापासून आम्ही यावर विचार करत होतो. यावेळी आता याला मूर्त स्वरूप दिले जाईल. एडेन मार्करम तिसऱ्या, राहुल त्रिपाठी चौथ्या, निकोलस पूरन पाचव्या, अब्दुल समद सहाव्या तर वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.”

अभिषेक शर्मा याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वेळा पंजाब संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. यावेळी आयपीएल लिलावात त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये जोरदार लढत रंगली. अखेरीस सनरायझर्सने ६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यापूर्वी गेले दोन हंगाम तो याच संघाचा भाग राहिला आहे.

आयपीएल २०२२ साठी सनरायझर्स हैदराबाद संघ-

केन विलियम्सन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडेन मार्करम, मार्को जॅन्सेन, रोमॅरियो शेफर्ड, सीन ऍबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी

महत्वाच्या बातम्या-

IPL 2022: केएल राहुलची किंमत पीएसएलच्या महागड्या बाबरपेक्षा १३ पट अधिक; बीबीएल, सीपीएल आसपासही नाही (mahasports.in)

आयपीएल लिलावात कोट्याधीश होताच ‘या’ इंग्लिश खेळाडूने सोडली पीएसएल (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---