गोल्ड कोस्ट | भारतीय मल्लांनी येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांचा सपाटा सुरू केला आहे. त्यात राहूल आवारे, बबीता फोगाट आणि किरण या खेळाडूंचा समावेश आहे.
बबिता फोगाटने आज ५३ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. यामूळे भारताचे पदकतालिकेतील स्थान भक्कम झाले आहे. तिला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
फायनलमध्ये कॅनडाच्या डायना विकरकडून तिला ५-३ असे पराभवला सामोरे जावे लागले. तिने आज एकूण ४ सामने खेळले. त्यात सामन्यात नायजेरीया, दुसऱ्या सामन्यात श्रीलंका तर तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूला तिने पराभूत केले.
२०१० दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिला रौप्यपकावर समाधान मानावे लागले होते. तेव्हा ती ५१ किलो वजनी गटात खेळली होती.
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची आता एकूण २८ पदके झाली असून त्यात १३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९कांस्यपदक आहेत.