आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना आतुरता लागली असेल. पण त्याआधी मेगा लिलाव होणार आहे. त्यामध्ये अनेक संघात मोठमोठे बदल होताना दिसतील. आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एकूण 4 खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामध्ये अक्षर पटेल (Axar Patel), ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs), अभिषेक पोरेल (Abishek Porel) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या 4 खेळाडूंचा समावेश आहे. आता एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल दिल्लीचा कर्णधार होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी हंगामात अक्षर पटेल (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) कर्णधारपद स्वीकारू शकतो. शेवटच्या हंगामात आरसीबीविरूद्धच्या सामन्यात अक्षरने पंतच्या जागी दिल्लीचे नेतृत्व केले होते. 2025च्या मेगा लिलावापूर्वी दिल्लीने अक्षरला 16.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. दिल्लीने कायम ठेवलेला तो सर्वात महागडा खेळाडू आहे.
अक्षर पटेल (Axar Patel) 2019 पासून दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) खेळत आहे. त्याने दिल्ली फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करताना एकूण 82 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 967 धावांसह 62 विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. यापूर्वी त्याने 68 सामन्यात 686 धावा करण्यासोबतच पंजाब किंग्जकडून खेळताना 61 विकेट्स घेतल्या होत्या.
अक्षर पटेलच्या आयपीएल (IPL) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलच्या इतिहासात 150 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 21.47च्या सरासरीने फलंदाजी करताना 1,653 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. सोबतच त्याने 7.28च्या इकाॅनाॅमी रेटसह 123 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 25.20 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Border Gavaskar Trophy; रिषभ पंतला घाबरतो कांगारू संघ?
रोहितच्या जागी ‘हा’ खेळाडू देणार संघासाठी सलामी, गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं
मराठमोळा आयुष आयपीएलमध्ये खेळणार! सीएसकेने ट्रायलसाठी बोलावले