आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यात येणार असल्याचे ‘आयसीसी’ने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची गरज नाही. मात्र आयसीसीने अद्याप त्याच्या वेळापत्रकाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाबाबत मीडिया रिपोर्ट्समध्ये मोठी माहिती समोर येत आहे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि भारतीय संघाच्या सामन्याची संपूर्ण माहिती रिपोर्ट्समध्ये शेअर करण्यात आली आहे.
रेव्ह स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (19 फेब्रुवारी) पासून सुरू होऊ शकते. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान-न्यूझीलंड संघात होऊ शकतो. यानंतर (20 फेब्रुवारी) रोजी भारत-बांगलादेश आमने-सामने असणार आहेत.
रिपोर्टनुसार, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात असणार आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना ग्रुप स्टेजमध्येच भारत-पाकिस्तान संघातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तानला ब गटात ठेवले आहे.
भारतीय संघ (20 फेब्रुवारी) पासून बांगलादेशविरूद्धच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. यानंतर भारत आपला दुसरा सामना (23 फेब्रुवारी) पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. भारत साखळी फेरीचा शेवटचा सामना (2 मार्च) न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे. मात्र, हायब्रीड मॉडेलनुसार भारताचे सामने कुठे खेळवले जातील? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारताचे सामने दुबईत आयोजित केले जाऊ शकतात, असे मानले जात आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना (4 मार्च), दुसरा सेमीफायनल सामना (5 मार्च) आणि फायनल सामना 9 मार्चला होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्राॅफीचे संपूर्ण वेळापत्रक-
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी – भारत विरूद्ध बांगलादेश, तटस्थ ठिकाण
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी – भारत विरूद्ध पाकिस्तान, तटस्थ ठिकाण
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड, रावलपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका, रावलपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरूद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश, रावलपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड, लाहोर
2 मार्च – भारत विरूद्ध न्यूझीलंड, तटस्थ ठिकाण
4 मार्च – पहिला सेमीफायनल सामना, तटस्थ ठिकाण
5 मार्च – दुसरा सेमीफायनल सामना, तटस्थ ठिकाण
9 मार्च – फायनल, तटस्थ ठिकाण
10 मार्च – राखीव दिवस
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने गोलंदाजीत घातला धुमाकूळ, घेतल्या 5 विकेट्स
टी20 वर्ल्ड कपच्या विजयाने वर्ष खास बनवले, 17 वर्षांनंतर भारत विश्वविजेता ठरला
Year Ender 2024; नेमबाजी, हाॅकीपासून बुद्धिबळपर्यंत, या वर्षात खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा वाढवली