आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साधी सर्व संघ आतापासूनच तयारीला लागले आहेत. भारतीय संघ देखील येत्या काही महिन्यांमध्ये टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असेल. पण विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांच्या नावावर मागच्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. पण आता याच मुद्यावर भारताच्या माजी सलामीवीर फलंदाजाने मोठी प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा भारतासाठी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये कर्णधार म्हणून खेळला. या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रदर्शन अपेक्षित नव्हते. कर्णधार रोहितने हा विश्वचषक संपल्यानंतर 2023च्या वनडे विश्वचषकासाठी तयारी सुरू केली. याच पार्श्वभूमीवर दरम्यानच्या काळात त्याने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. पण भारताचा माजी सलामीवीर आणि आकाश चोप्रा याच्या मते रोहित आगामी टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा कर्णधाराच्या रुपात खेळे. आकाशच्या मते हार्दिक पंड्या वारंवार दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. असात त्याला विश्वचषकात कर्णधारपदाची संधी मिळणे शक्य दिसत नाही.
आपल्या युट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला, “हार्दिक शक्यतो संघाचा कर्णधार नसेल. कारण त्याच्या फिटनेसचा मुद्दा आहे. तो वर्तमानात खेळतच नाहीये. विश्वचषकात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो खेळणार नाहीये. कसोटी क्रिकेट तर तो कुठल्याच परिस्थित खेळत नाहीये. अशात तो थेट आयपीएल खेळणार आहे. या सर्व गोष्टी हार्दिकच्या विरोधात आहेत.”
“रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार असणार आहे. 2024च्या टी-20 विश्वचषकातही तोच संघाचे नेतृत्व करेल. हा प्रश्न जर 2022 विश्वचषकानंतर विचारला गेला असता, तर कदाचीत रोहित संघाचा कर्णधार नसता. पण विश्वचषकातील संघाचे प्रदर्शन पाहता पहिल्या 10 षटकांमध्ये 60 धावा बनत होत्या. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल ही पहिल्या तीन क्रमांकावर खेळत होते.”
दरम्यान, आकाश चोप्राने पुढे असेही म्हणाला की, मागच्या वर्षी वनडे विश्वचषातील संघ आणि आगामी टी-20 विश्वचषकातील भारतीय संघ मिळता जुळता असेल. वनडे विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यापूर्वी एकाही सामन्यात पराभूत झाला नव्हता. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. (According to Akash Chopra, the captaincy of India’s T20 team will remain with Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
David Warner Farewell: सिडनीत वॉर्नरच्या निरोप समारंभासाठी प्रेक्षकांना थेट मैदानात एंट्री, पाहा व्हायरल फोटो
रिषभ पंतची बहीण साक्षीची नव्या इनिंगला सुरूवात; बाॅयफ्रेंड अंकित चौधरीसोबत केली एंगेजमेंट, पाहा फोटो