2025च्या आयपीएल हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी एक मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. दरम्यान एक बातमी समोर आली आहे की, गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) आयपीएलमध्ये आपला पगार कमी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि 31 ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपूर्वी आयपीएल फ्रँचायझीद्वारे कायम ठेवणारा तो दुसरा खेळाडू असेल.
शुबमन गिलने (Shubman Gill) 2024 मध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) नेतृत्व केले. त्यामुळे गिल आणि संघ व्यवस्थापन संघातील प्रमुख खेळाडूंना कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. टायटन्ससाठी पहिला रिटेन होणारा खेळाडू उत्कृष्ट फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) असेल. त्यानंतर संघ साई सुदर्शन आणि अनकॅप्ड खेळाडू म्हणून राहुल तेवतिया, शाहरुख खान यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे.
वास्तविक, आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले की, “शुबमन गिलने आयपीएलमध्ये आपला पगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून संघ आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवू शकेल आणि एक मजबूत संघ तयार करू शकेल.”
मेगा लिलावापूर्वी (Mega Auction) जारी केलेल्या आयपीएल रिटेन्शनुसार, संघाने पहिल्या खेळाडूला कायम ठेवल्यास 120 कोटी रुपयांच्या वाढीव रकमेपैकी 18 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूला कायम ठेवल्यास 14 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूला कायम ठेवल्यास 11 कोटी रुपये गमावावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूंसाठी संघाला प्रत्येकी 4 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर एखाद्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या 5 खेळाडूंना कायम ठेवले तर लिलावात त्यांच्या पैशातून 75 कोटी रुपये कापले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय महिलांसाठी सर्वाधिक शतके
काय सांगता! एका चेंडूत बनल्या चक्क 10 धावा, कसोटी सामन्यात घडली अनोखी घटना!
मुंबई कसोटीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार का? सहाय्यक प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया