आशिया चषक 2023चा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना लो स्कोरिंग ठरला. अवघ्या 50 धावा करून श्रीलंका संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. मोहम्मद सिराज या सामन्यात सामनावीर ठरला, तर कुलदीप यादव मालिकावीर ठरला.
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज () याने 7 षटकात 21 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आशिया चषक (Asia Cup) 2023मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. कुलदीपने स्पर्धेत 5 सामने खेळले, ज्यामध्ये 28.3 षटकांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज याने कुलदीपपेक्षा एक विकेट जास्त म्हणजे हंगामात 10 विकेट्स घेतल्या. पण कुलदीप लीग स्टेज आणि सुपर फोरमधील महत्वाच्या सामन्यांमध्ये भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकला.
मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर कुलदीपने आपल्या प्रदर्शनाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा () याला दिले. कुलदीप काही महिन्यांपूर्वी बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत होता आणि मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली नव्हती. अशा वेळी कर्णधार रोहितकडून त्याला मोलाचा सल्ला मिळाला होता. कुलदीपने सांगितल्याप्रमाणे रोहितचा हाच सल्ला त्याच्या पुनरागमनासाठी कारणीभूत ठरला.
Kuldeep Yadav put on a show with the ball, scalping 9⃣ wickets, & won the Player of the Series as #TeamIndia win the #AsiaCup2023 Final by 10 wickets ???? ????#INDvSL pic.twitter.com/1GHZYBM8US
— BCCI (@BCCI) September 17, 2023
मालिकावीर ठरल्यानंतर कुलदीप यादव म्हणाला की, “मागचे 18 महिने अप्रतिम ठरले. मी यादरम्यानच्या काळात खरोखर चांगले काम केले. याचे श्रेय रोहित भाईला जाते. त्याने एनसीएमध्ये मला सल्ला दिला होता, जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो. हा सल्ला कामी आला.” दरम्यान, भारताने मागच्या दोन आशिया चषक ट्रॉफी कर्णधार रोहित शर्मा याच्याच नेतृत्वात जिंकला आहे. भारताने जिंकलाला हा आठवा विश्वचषक ठरला. (According to Kuldeep Yadav, captain Rohit Sharma’s guidance enabled him to make a comeback in the team)
महत्वाच्या बातम्या –
“आता लक्ष विश्वचषक”, कॅप्टन रोहितने आशिया चषक विजयानंतर केली मिशन वर्ल्डकपची घोषणा
दुसऱ्या पीसीबीएसएल स्पर्धेत मनिषा रॉयल्स व रॉकेट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत