‘महिला प्रीमियर लीग’च्या (Women Premier League) आगामी म्हणजेच तिसऱ्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेचा तिसरा हंगाम (6 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी) दरम्यान सुरू होऊ शकतो. क्रिकबझच्या मते, महिला प्रीमियर लीग 2025चे सामने लखनऊ आणि बडोदा येथे खेळवले जातील. फायनल सामन्याचे यजमानपद बडोद्याला मिळू शकते. मात्र, अद्यापपर्यंत तारीख आणि मैदानाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. खरे तर बडोद्याच्या कौटंबी स्टेडियमने तेथील सुविधा जागतिक दर्जाच्या बनविल्या आहेत. अलीकडेच या मैदानावर भारत-वेस्ट इंडिजचे महिला संघ आमनेसामने आले होते. याशिवाय या मैदानावर विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. त्याच वेळी, महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी, याआधी मुंबई इंडियन्ससाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) दुखापतीनंतर मैदानात परतली नाही. अलीकडेच हरमनप्रीत कौर भारत-वेस्ट इंडिज मालिकेत खेळली नाही. वास्तविक, सध्या मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे, जिथे ती तिच्या फिटनेसवर काम करत आहे. मात्र, महिला प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी हरमनप्रीत कौर तिच्या दुखापतीतून सावरेल असे मानले जात आहे, मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
महिला प्रीमियर लीगचे सर्व संघ-
यूपी वॉरियर्स- कायम ठेवलेले खेळाडू: अलिसा हिली (कर्णधार), अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, वृंदा दिनेश, सायमा ठाकोर, पूनम खेमनार, गौहर सुल्ताना, चेमारा उमाथाना
लिलाव खरेदी: आरुषी गोयल, क्रांती गौड, अलाना किंग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- कायम ठेवलेले खेळाडू: स्म्रीती मानधना (कर्णधार), सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, एलिस पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, सोफी मोलिनक्स, एकता बिश्त, केट क्रॉस, कनिका आहुजा, डॅनी व्याट
लिलाव खरेदी: प्रेमा रावत, जोशीथा व्हीजे, राघवी बिस्त, जाग्रवी पवार
गुजरात जायंट्स- कायम ठेवलेले खेळाडू: ॲश्ले गार्डनर, बेथ मुनी (कर्णधार), दयालन हेमलथा, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, कशवी गौतम, प्रिया मिश्रा, मन्नत कश्यप, भारती फुलमारे, सातारामी
लिलाव खरेदी: डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, डॅनियल गिब्सन, प्रकाशिका नाईक
मुंबई इंडियन्स- कायम ठेवलेले खेळाडू: मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जिंतीमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, अमनदीप कौर, केथना, एस.
लिलाव खरेदी करते: नदीन डी क्लर्क, जी. कमलिनी, संस्कृती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी
दिल्ली कॅपिटल्स- कायम ठेवलेले खेळाडू: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, मारिझान कॅप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू, ॲनाबेल सदरलँड
लिलाव खरेदी: नंदिनी कश्यप, एन चरणी, सारा ब्राइस, निकी प्रसाद
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या दुखापतीचे कारण काय? माजी दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न
Champions Trophy; अफगाणिस्तानविरूद्ध नाही खेळणार इंग्लंड? ईसीबीने सांगितले कारण
भारताच्या युवा खेळाडूनं जिंकली चाहत्यांची मनं, ऑस्ट्रेलियाच्या लहान मुलाला दिली बॅट