रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024-25)ची पुढील फेरी (23 जानेवारी) पासून खेळवली जाणार आहे. दरम्यान आता अशी बातमी समोर आली आहे की, विराट कोहली (Virat Kohli) दिल्ली संघाकडून पुढील सामना खेळणार नाही. पण तो (30 जानेवारी) पासून सुरू होणाऱ्या रेल्वेविरूद्धच्या सामन्यात खेळेल. दिल्लीचा पुढील सामना (23 जानेवारी) पासून सौराष्ट्रविरूद्ध होणार आहे, परंतु कोहलीने मानेच्या दुखण्याचे कारण देत या सामन्यात खेळण्यास नकार दिला.
विराट कोहलीने (Virat Kohli) 2012 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला होता, पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. दिल्लीचा संघ लीग टप्प्यातील शेवटचा सामना रेल्वेविरूद्ध खेळेल. दिल्लीचा समावेश ड गटात आहे. त्यांनी आतापर्यंत 5 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे, तर 1 पराभव पत्करला आहे आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दिल्ली सध्या ग्रुप डीच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. अशा परिस्थितीत, कोहलीचा रेल्वेविरुद्धचा सामना दिल्लीसाठी क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
विराट सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत (Border Gavaskar Trophy) 5 सामन्यांत त्याने फक्त 190 धावा केल्या. तर गेल्या वर्षी त्याने 19 कसोटी डावात फक्त 417 धावा केल्या होत्या आणि त्याच्या 24.53च्या खराब सरासरीमुळेही त्याच्यावर टीकाही झाली होती.
या खराब फाॅर्म दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनला गेला. त्यावेळीच तिथे तो राधा वल्लभजींनाही भेटला. आजकाल, भारतीय नियामक मंडळाची (BCCI) 10-कलमी धोरणे देखील चर्चेत आहेत, ज्या अंतर्गत सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेही झाला कर्णधार, ‘या’ संघाची धुरा सांभाळणार
IPL 2025; ‘या’ 3 कारणांमुळे लखनऊने केलं रिषभ पंतला कर्णधार..!
IPL 2025; LSGचा कर्णधार झाल्यानंतर रिषभ पंतला आली धोनीची आठवण! म्हणाला…