टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांमध्ये घटस्फोट होणार आहे. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, धनश्री आणि चहल यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सर्वकाही ठीक नाही. त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून चहलनं धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलेट केले आहेत.
आता प्रश्न उभा राहतो की, जर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात काडीमोड झाला, तर त्यांच्या प्रॉपर्टीचं विभाजन कसं होईल? यासंबंधी नियम काय आहेत? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही या बातमीद्वारे देतो. युजवेंद्र चहल क्रिकेटद्वारे भरपूर कमाई करतो. यासोबतच तो जाहीरातीतूनही कमाई करतो. तर धनश्री वर्मा ही प्रोफेशनल डान्सर आहे. ती अनेक टीव्ही रियालिटी शो मध्ये दिसली आहे. ती देखील चांगली कमाई करते. आता या दोघांमध्ये घटस्फोटाची बातमी आली आहे.
वास्तविक, घटस्फोटाच्या बाबतीत सर्वकाही कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतं. जर घटस्फोट झाला, तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी हवी की नाही? हे धनश्रीवर अवलंबून असेल. ती यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकते. मात्र हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बाबतीत हिस्सेदारीची बातमी समोर आली नव्हती.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न 2020 मध्ये झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान डान्सचे क्लास घेताना धनश्रीची ओळख युजवेंद्रशी झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात पुनरागमनासाठी धडपडत असून त्यानं टीम इंडियासाठी शेवटचा सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला आहे.
हेही वाचा –
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
चहल-धनश्रीच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर उचललं मोठं पाऊल; आता घटस्फोट निश्चित!
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर, शेवटच्या डावात गोलंदाजी करणार?