भारतीय संघाचा सध्या श्रीलंका दौरा आहे. भारत श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पूर्वी दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो. असा दावा दैनिक जागरणच्या एका अहवालात करण्यात आला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. दैनिक जागरणच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, क्रिकेट संचालक सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) पंतला पाठिंबा असूनही, दिल्ली कॅपिटल्स (DC) पंतला मेगा लिलावापूर्वी सोडू शकतात.
दैनिक जागरणच्या अहवालात पुढे म्हटलं आहे की, जर पंतला दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) सोडलं तर त्याची संभाव्य जागा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) असेल. कारण महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) भविष्यात निवृत्त होणार असल्यानं, चेन्नई भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात आहे आणि पंतसारख्या प्रतिभावान खेळाडूला करारबद्ध करण्यात त्यांना आवडेल.
रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स (DC) व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर फारसे खूश नाही आणि त्याला आयपीएल 2025 साठी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही. पंतला सोडण्यात आले तर चेन्नई सुपर किंग्ज यष्टिरक्षक फलंदाजाला करारबद्ध करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.
पंतनं अपघातातून बरा झाल्यावर साधारणत: 16 महिन्यानंतर आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) पुनरागमन केलं होतं. आयपीएल 2024च्या हंगामात त्यानं दिल्ली कॅपिटल्सकडून 13 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 446 धावा ठोकल्या. 466 धावांच्या खेळीत त्यानं 3 अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याचे स्ट्राईक रेट 155.40 राहिले तर सरासरी 40.55 राहिली. आयपीएल 2024च्या हंगामात पंतनं 25 षटकारांसह 36 चौकार लगावले. या हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 88 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!
‘हिम्मत असेल तर…’,मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफलवांवर तोडले मौन