शेवटच्या हंगामात हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) गुजरात टायटन्स संघाची साथ सोडली. हार्दिक त्याच्या जुन्या संघात म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्यानंतर शुबमन गिलनं (Shubman Gill) कर्णधारपदाची धुरा सांभाळली. पण गुजरात टायटन्स (GT) व्यवस्थापनात अनिश्चिततेची परिस्थिती आहे. सध्या नुकतीच अशी बातमी आली होती की, गुजरात आपले मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराला (Ashish Nehra) हटवू शकते.
मात्र, आता आशिष नेहरा (Ashish Nehra) हे मुख्य प्रशिक्षक राहणार की रजेवर जाणार अशा बातम्या येत आहेत, यावर सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. आयपीएल लिलावापूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात टायटन्स कोचिंग स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक म्हणून विक्रम सोलंकी कार्यरत आहेत तर नेहरा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. दोघेही गेल्या 3 हंगामापासून गुजरातशी जोडले गेले आहेत.
याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आहेत, पण गुजरात टायटन्स (Gujrat Titans) व्यवस्थापनात मोठा उलटफेर होण्याची दाट शक्यता आहे. विक्रम सोलंकी गुजरात टायटन्ससोबतच राहतील असे मानले जात असले तर आशिष नेहरा रजेवर जाऊ शकतो. त्यामुळे गुजरातच्या व्यवस्थापनात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.
याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या (RR) कॅम्पमधूनही मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी कुमार संगकाराला सामील करण्याचा विचार करत आहे. कुमार संगकारा इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला तर राजस्थान रॉयल्स राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) मोठी जबाबदारी सोपवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या–
कोहली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर कोच शास्त्री सतत भांडायचे; भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा
या दशकात 5 खेळाडूंनी भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा, रोहित-विराटनंतर ‘या’ खेळाडूंचे वर्चस्व
“मला भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचं आहे”, सूर्यकुमार यादवने बोलून दाखवली खदखद