आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champion’s Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? हे अद्याप निश्चित झाले नाही. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champion’s Trophy) भारत पाकिस्तानात नक्कीच येईल, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, या स्पर्धेच्या फायनल सामन्याचे स्थान भारताच्या म्हणण्यानुसार ठरवले जाऊ शकते.
द टेलिग्राफ यूकेच्या रिपोर्ट्सनुसार, जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना त्यांच्या गट सामन्यांसह पाकिस्तानच्या बाहेर हलवला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, फायनल सामना लाहोरहून दुबईला हलवला जाऊ शकतो.
2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champion’s Trophy) सामने लाहोर, कराची आणि रावलपिंडी येथे खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार असून तिचा फायनल सामना (9 मार्च) रोजी होणार आहे.
तत्पूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे की, “चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत अंतिम निर्णय भारत सरकार घेईल.” आशिया चषकासाठी (Asia Cup) पाकिस्तानला न जाण्याच्या निर्णयामागे बीसीसीआयने गेल्या वर्षी भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्याचे कारण सांगितले होते. त्यावेळी या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये संयुक्तपणे करण्यात आले होते. त्यावेळी भारताने सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी दिग्गजाचा भारताच्या युवा खेळाडूला सल्ला! म्हणाला, “त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध…”
अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, 27 वर्षांचा दुष्काळ संपवल्याचं बक्षीस मिळालं
ind vs ban; दुसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूचा होणार पत्ता कट?