सध्या भारतीय नियामक मंडळाचे (BCCI) सचिव म्हणून जय शाह (Jay Shah) कार्यरत आहेत. पण जय शाह (Jay Shah) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष बनले असून त्यांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबरनंतर जय शाह यांच्या पदाची धुरा कोण सांभाळणार? या प्रश्नासंदर्भात एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये जय शाहनंतर बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी कोणाला दिली जाऊ शकते, हे सांगण्यात आले आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, जय शाह (Jay Shah) यांच्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली (Rohan Jaitley) यांना बीसीसीआयचे (BCCI) सचिव बनवले जाऊ शकते. रोहन जेटली यांच्याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल (Anil Patel) यांचेही नाव बीसीसीआय सचिव होण्याच्या शर्यतीत आहे.
ROHAN JAITELY IS ALL SET FOR BCCI SECRETARY
– Rohan Jaitley is the frontrunner to replace Jay Shah as the new BCCI Secretary. [India Today] pic.twitter.com/AMpqpzgk9x
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2024
रोहन जेटली (Rohan Jaitley) सध्या दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याआधीही रोहन जेटली बीसीसीआयचे सचिव बनल्याचा रिपोर्ट समोर आला होता, जो त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला होता. मात्र, या प्रकरणाची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
आयसीसी (ICC) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी जय शाह (Jay Shah) यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यांच्या उमेदवारीला 16 पैकी 15 सदस्यांनी पाठिंबा दिला. जय शाह आता 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बेली यांची जागा घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रायन लाराच्या आधी ‘या’ फलंदाजाने ठोकल्या असत्या कसोटीत 400 धावा
उचलली जीभ, लावली टाळ्याला!; म्हणे, “पाकिस्तान भारताला कसोटी मालिकेत पराभूत करू शकतो”
कसोटीमध्ये व्हाईटवाॅश देऊन मालिका जिंकणारे टाॅप-5 संघ