इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे यंदाचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होती. परंतु, २९ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत आयपीएल स्पर्धा पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये आयपीएलचे राहिलेले ३१ सामने होणार आहेत. यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टी-२० विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु आयपीएलमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्न उभे राहिले आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामने इंदोरमध्ये होणार?
माध्यमांतील वृत्तांनुसार, टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये. परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, या बैठकीत विश्वचषक सामने इंदोरमध्ये खेळवण्यात येणार असल्याची चर्चा झाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील इंदोरमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यावर विचार करू असे आश्वासन दिले आहे.
बीसीसीआयच्या या बैठकीत, एमपीएकडून राजू सिंग चौहान यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली होती. या बैठकीत राजू सिंग चौहान यांनी विश्वचषक स्पर्धेतील सामने इंदोरमध्ये खेळवण्यात यावे अशी मागणी केली होती.
राजू सिंग चौहान यांनी या बैठकीत म्हटले की, “मी या बैठकीत विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंदोरला देण्याची मागणी केली आहे. इंदोरमध्ये आतापर्यंत जितके आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. ते यशस्वीरित्या पार पडले आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही आम्ही बीसीसीआयच्या देशांत्रगत टी-२०, वनडे आणि महिला क्रिकेट स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मला आश्वासन दिले आहे की, जर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात झाले. तर आम्हाला सामने खेळवण्याचा मान दिला जाईल.”
अशात टी-२० विश्वचषकाचे यजमानपद मुंबई, दिल्ली, चेन्नई नव्हे त्रयस्थ अशा इंदोर स्टेडियमला मिळते की नाही, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बापमाणूस गमावला; आता भूवीच्या आईचीही तब्येत नाजूक, रुग्णालयात आहेत भरती
विश्वविजेत्या भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार खेळणार परदेशी लीग, ठरला पहिलाच खेळाडू
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची न्यूझीलंडविरुद्ध चिंताजनक आकडेवारी, WTC फायनलमध्ये अवघड होणार!