आगामी आयपीएल 2025 पूर्वी प्रत्येक संघात मोठे उलटफेर होताना दिसणार आहेत. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोटर्सनुसार, दिल्लीनं भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगशी (Yuvraj Singh) चर्चा केली आहे. दिल्ली फ्रँचायझी युवराज सिंगला प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्पोर्टस्टारच्या रिपोर्ट्सनुसार, प्रशिक्षकाच्या भूमिकेबाबत दिल्लीनं युवराज सिंगशी बोलणी सुरू केली आहेत. दिल्लीसोबतच गुजरात टायटन्सही युवराजशी बोलू शकते. गुजरात त्याला आशिष नेहराच्या जागी प्रशिक्षकपदाची ऑफर देऊ शकते. युवराज हा अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच त्यानं आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं भारतासाठी अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
युवराजच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 2,750 धावा केल्या आहेत. युवराजनं आयपीएलमध्ये 13 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानं गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आणि 36 विकेट्सही घेतल्या. युवराजनं भारतासाठी 58 टी20, 304 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामनेही खेळले आहेत. 58 टी20 सामन्यात त्यानं 1,177 धावा केल्या आहेत. 304 एकदिवसीय सामन्यात त्यानं 8,701 धावा केल्या, तर 40 कसोची सामन्यात 1900 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल स्टार खेळाडूनं केलं खळबळजनक वक्तव्य! म्हणाला…
राहुल द्रविडच्या मुलाला सूर गवसेना, पुन्हा छोटेखानी खेळीवर बाद; संघाचाही तिसरा पराभव
अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू, नावावर आहेत 5 हजारांहून अधिक धावा