इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या मते भारतीय संघ यावेळी वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी दावेदार आहे. ब्रॉडच्या मते इंग्लंड देखील भक्कम संघासह विश्वचषकात उतरत आहे. मात्र, संघाला विश्वचषकादरम्यान खूप प्रवास करावा लागणार आहे. अशात गतविजेत्या संघाला ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रण घ्यावे लागणार हे नक्की.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पाचवा सर्वोता यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने यावर्षी जुलै महिन्यात 604 कसोटी विकेट्ससह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ‘डेली मेल’साठी लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये स्टुअर्ट ब्रॉड वनडे विश्वचषक 2023 विषयी अंदाज वर्तवताना दिसला. यजमान भारतीय संघ विजेतेपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार असल्याचे त्याने यामध्ये सांगितले. त्याने लिहिले की, “इंग्लंड संघाला विश्वचषक ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवण्यात यश आले, तर यासाठी त्यांना अभूतपूर्व प्रयत्न करावे लागतील. मला वाटते भारतीय संघ विश्वचषकात व्यवस्थित खेळला, तर त्यांना रोखने खूप कठीण असेल. जोस बटलर (इंग्लंडचा कर्णधार) याच्याकडे नक्कीच भक्कम संघ आहे, जे मोठी धावसंख्या उभी करू शकतात. पण यजमान आणि वनडे क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारतावर मात करणे कठीण असेल.”
इंग्लंडला वनडे विश्वचषकातील 9 ग्रुप स्टेज सामने आठ वेगवेगळ्या ठिकाणी खेळायचे आहेत. ब्रॉडने आपल्या कॉलममध्ये याकडेही लक्ष वेधले. कारण इंग्लंड संघाच्या प्रदर्शनावर या प्रवासाचा परिणाम होऊ शखतो. त्याने लिहिले की, “असे वाटू नये की, मी काहीतरी कारण सांगत आहे. पण खरोखर सांगायचे झाले तर, इंग्लंडचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. त्यांना एका ठिकाणी दोन सामने देखील खेळायचे नाहीत. त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे.”
दरम्यान, वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. (According to Stuart Broad, the Indian team can win the 2023 World Cup)
महत्वाच्या बातम्या –
दरियादिल सॅमसन! वर्ल्डकप स्कॉडमध्ये वगळळ्यानंतरही खचला नाही, पाकिस्तानी अष्टपैलूसोबत खळखळून हसला
वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ टॉप 4मध्ये पोहोचला, तर…, भारतीय दिग्गजाने कुणाविषयी केले भाष्य?