पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाचा असा विश्वास आहे की आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पराभूत करण्याची भारताकडे चांगली संधी आहे. कारण गोलंदाजांसाठी या हाय-प्रोफाइल मालिकेसाठी पूर्णपणे अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची आशा नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील 4 सामन्यांची कसोटी मालिका ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामन्याने 17 डिसेंबरपासून सुरू होईल.
रमीझने एका यूट्यूब चॅनलला सांगितले की, ‘ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या आता तशा नाहीत जशा काही वर्षापूर्वी असायचा. मला म्हणायचे आहे की आता बाऊन्स कमी आहे, चेंडू हालचाल कमी करतो आणि त्यामुळे खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी इतके अनुकूल नसतात. आणि मला वाटते की ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध पाच दिवस कसोटी सामना चालेल असाच विचार करेन.’
टीम इंडियाला आर्थिक फायद्यासाठी मिळणार सोपी खेळपट्टी ?
कोविड -19 साथीमुळे प्रचंड नुकसान झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मालिकेतून बऱ्याच आशा आहेत. माजी कसोटी सलामीवीर रमीझ म्हणाले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्धच्या मालिकेत फायदा होण्याची गरज आहे. मालिका पाहणाऱ्यांची संख्या आणि मैदानातील प्रेक्षकांकडून येणारा पैसा किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना ठाऊक आहे.’
ते म्हणाले, ‘ऍडलेडमधील पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीबद्दल आधीच तक्रारी आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कसोटी सामना पाच दिवस चालवावा, असे वाटते आणि त्यानुसार ते खेळपट्टी तयार करतील.
भारताकडे आहे चांगली फलंदाजीची ऑर्डर
रमीझ राजा म्हणाला, ‘माझ्यामते भारताकडे फलंदाजीची ऑर्डर आहे, जी ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल आणि त्याचबरोबर भारतीय गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यांचा गोलंदाजीचा हल्ला खूप चांगला आहे आणि हाही विचार ऑस्ट्रेलियाच्या डोक्यात असेल.’
रमीझ म्हणाला की, ‘रोहित शर्माची कमी मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला जाणवेल. कारण आज तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील जगातील एक मोठा फलंदाज आहे.’
रोहित पायाच्या स्नायूच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि तो फक्त कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
‘हा’ आंतरराष्ट्रीय संघ नाही करणार ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ मोहिमेचे समर्थन
एबीडी पुन्हा झाला बाबा ! सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज