पुणे, 19 जानेवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत महिला गटात एसेस, पुरूष गटात विझार्ड्स,लेकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महिला गटात सलामीच्या लढतीत एसेस संघाने स्पार्क्स संघाचा 16-09 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. एसेस संघाकडून इशा हुमनाबादकरने 12 गुण करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पार्क्सकडून आरवी सोनटक्के(6गुण)ने सुरेख कामगिरी केली.
पुरुष गटात पहिल्या सामन्यात अपूर्व सोनटक्के 24गुण) याने केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर विझार्ड्स संघाने ब्लेझर्स संघाचा 28-26 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात लेकर्स संघाने माव्हरिक्स संघाचा 20-12 असा पराभव करून विजयी सुरुवात केली. लेकर्स संघाकडून अंकुर शहा(14गुण)ने उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, सिध्दार्थ भावे, सुवर्णा लिमये, कर्णा मेहता, आदी मान्यवर उपस्थित होते. (Aces, Wizards, Lakers’ winning opening in the first basketball league tournament)
निकाल: साखळी फेरी:महिला गट:
एसेस: 16(इशा हुमनाबादकर 12) वि.वि.स्पार्क्स: 9(आरवी सोनटक्के 6); हाफ टाईम: 5-4;
पुरुष गट: विझार्ड्स: 28(अपूर्व सोनटक्के 24) वि.वि.ब्लेझर्स:26(अक्षय गडकरी 12) हाफ टाईम:11-13;
लेकर्स: 20(अंकुर शहा 14) वि.वि.माव्हरिक्स: 12(दर्शन कांकरिया 8); हाफ टाईम: 5-9;
महत्वाच्या बातम्या –
स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-20 क्रिकेट स्पर्धेत 8 निमंत्रित संघ सहभागी
खेलो इंडिया युथ गेम्स । हरयाणा, राजस्थान संघांकडून महाराष्ट्र पराभूत