कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2023 स्पर्धेत खास कामगिरी करताना दिसत नाहीये. मात्र, संघाचा मधळ्या फळीतील फलंदाज रिंकू सिंग हा शानदार फॉर्ममध्ये आहे. रिंकूच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली जात आहे, ती जबाबदारी तो लीलया पार पाडताना दिसत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध एका षटकात सलग 5 षटकार मारत तो रातोरात स्टार बनला. यानंतर त्याने खुलासा केला की, त्या खेळीनंतर केकेआर संघाचा सहमालक शाहरुख खान आणि त्याच्याशी फोनवर चर्चा झाली. रिंकूला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये शाहरुखचाही समावेश होता. त्याने सोशल मीडियावर प्रशंसा केल्यानंतर रिंकूला फोनही केला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) संघातील सामन्यानंतर रिंकू सिंग (Rinku Singh) याला प्रश्न विचारण्यात आला. तो असा होता की, 5 षटकार मारल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यासोबत त्याची काय चर्चा झाली होती? यावर रिंकूने समालोचकांना उत्तर देत म्हटले की, “शाहरुख खान सरांनी मला त्या खेळीनंतर फोन केला होता. ते माझ्या लग्नाविषयी बोलत होते. ‘लोक मला त्यांच्या लग्नात बोलवतात. मात्र, मी जात नाही. तुझ्या लग्नात नाचायला येईल,’ असे ते मला म्हणाले.” यावर उपस्थित समालोचकांमध्ये एकच हशा पिकला. यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
When SRK Called Rinku Singh!#ShahRukhKhan???? #RinkuSingh pic.twitter.com/rC2Ki7eHwl
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) April 27, 2023
रिंकू सिंगची आयपीएल 2023मध्ये 2 अर्धशतक
रिंकू सिंग आयपीएल 2023 हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 62.75च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 251 धावा चोपल्या आहेत. तो यावेळी 4 वेळा नाबाद राहिला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध रिंकूने 10 चेंडूत 18 धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात कोलकाताकडून जेसन रॉय यानेही अर्धशतक ठोकले होते. तसेच, कर्णधार नितीश राणा यानेही 48 धावांची झंझावाती खेळी केली होती.
रिंकू सिंग 2018पासून कोलकाताच्या ताफ्यात
रिंकू सिंग याच्या आयपीएल 2023मधील खेळींवर नजर टाकली, तर त्याने 4, 46, नाबाद 48, नाबाद 58, 18, 6, नाबाद 53 आणि नाबाद 18 धावा केल्या आहेत. रिंकूला 2018 साली कोलकाताने आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यावेळी कोलकाताने त्याच्यावर 80 लाख रुपये खर्च केले होते. तेव्हापासून तो कोलकाताचा भाग आहे. रिंकूला त्यावेळी फक्त 4 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने 2 हंगामात 6 सामने खेळले होते. त्यानंतर सन 2021मध्ये रिंकू पूर्ण हंगामात बाकावर होता. मात्र, त्यानंतर संघाने त्याच्यावर विश्वास टाकला आणि आयपीएल 2022च्या मेगा लिलावात त्याला 55 लाख रुपयात आपल्या ताफ्यात सामील केले.
रिंकूने 2022मध्ये कोलकाताकडून 7 सामने खेळले होते. त्यात त्याने 34.80च्या सरासरीने 174 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची नाबाद 42 ही सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र, या हंगामात रिंकू चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पुढील सामन्यांमध्येही संघाला त्याच्याकडून शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. (actor shahrukh khan said to cricketer rinku singh teri shaadi mein aaunga naachne after hits cosecutive 5 sixes an over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या गोलंदाजाचा भीमपराक्रम! 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत कसोटीत रचला इतिहास
‘धोनीविरुद्ध खेळून मला कोणताही दबाव जाणवत नाही, उलट…’, RRच्या मॅचविनर पठ्ठ्याचे मोठे विधान






