भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आहे. अनुष्का सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती गोलंदाजीच्या सरावादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. मात्र, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
चित्रपटात अनुष्का साकारतेय झुलन गोस्वामीची भूमिका
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुष्काने झुलनप्रमाणे गोलंदाजी करताना दिसली. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
झालं असं की, अनुष्काने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ९४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १४ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. मात्र, काहींनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करत तिला ट्रोल केले.
https://www.instagram.com/reel/Ca873Z4p1x1/
नेटकरी करतायत ट्रोल
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आता ही होणार आरसीबीची नवीन कर्णधार.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आता घोड्यांच्या शर्यतीत गाढवही धावणार.” अशाप्रकारे नेटकरी अनुष्काला ट्रोल करत आहेत.
🚨 RECORD ALERT 🚨
Wicket No. 4⃣0⃣ in the WODI World Cups for @JhulanG10! 🔝 🙌
What a champion cricketer she has been for #TeamIndia ! 👏 👏 #CWC22 | #WIvIND
Follow the match ▶️ https://t.co/ZOIa3L288d pic.twitter.com/VIfnD8CnVR
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
महिला विश्वचषकाचा भाग आहे झुलन गोस्वामी
झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार गोलंदाज आहे, जी अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ मध्ये ती भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात तिने पाकिस्तानविरुद्ध २ आणि न्यूझीलंडविरुद्ध १ विकेट घेतली होती. झुलन गोस्वामीने भारतीय संघासाठी आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांमध्ये ४४ विकेट्स, १९७ वनडे सामन्यांमध्ये २४८ विकेट्स आणि ६८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.