पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज आशिया चषक 2022 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचे प्रदर्शन पाहून जगभरातील क्रिकेटप्रेमी त्याेच चाहते बनले आहेत. भारतीय टिव्ही अभिनेत्र्यांमध्ये नसीम शाह चांगलाच चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्ता यांच्यात बुधवारी 7 सप्टेंबर रोजी महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यातील नसीम शाहचे प्रदर्शन पाहून सुरभी ज्योती या भारतीय अभिनेत्रीने त्याचे चांगलेच कौतुक केले आहे. तत्पूर्वी बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील नसीमला तिच्या एका इंस्टाग्रामा रिलमध्ये जागा दिली होती.
सुरभी ज्योती बनली नसीम शाहची चाहती –
सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) हिने अफगाणिस्ताविरुद्ध नसीम शाह (Naseem Shah) याचे प्रदर्शन पाहून एक खास ट्वीट केले. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “पाकिस्तानला नक्कीच एक हिरा मिळाला आहे.” सुरभीने केलेले हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये देखील सुरभीच्या या ट्वीटविषयी चर्चा रंगल्या आहेत.
Pakistan has definitely got a gem…#NaseemShah 💯#AsiaCup2022
— Surbhi Jyoti (@SurbhiJtweets) September 7, 2022
सुरभी ज्योतीच्या आधी बॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने देखील नसीम शाहसोबतचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ केला होता. व्हिडिओत नसीम आणि उर्वशी एकमेकांकडे पाहताना दिसत होते. उर्वशी या रिलमध्ये लाजताना दिसत होती. सुरभी ज्योतीच्या कारकिर्दीचा विचार केला तिने सुप्रसिद्ध टिव्ही मालिला ‘नागिन’ मध्ये काम केले आहे. सुरभी ज्योतीला सर्वाधिक प्रसिद्ध ‘कबूल है’ या मालिकेतून मिळाली, असल्याचे दिसते. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला इंडियन टेली अवॉर्ड्सने सन्मानित केले गेले होते. तिने 2021 मध्ये बॉलिबुडमध्ये पदार्पण केले. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है’ असे होते.
Sunday chills may be… pic.twitter.com/jz5cfzHeUs
— Surbhi Jyoti (@SurbhiJtweets) August 28, 2022
नसीम शाहाचा सध्याचा फॉर्म पाहिला, तर तो सर्वत्र झाप पाडत आहे. भारताविरुद्ध त्याने चांगले प्रदर्शन केलेच, पण सुपर फोरमघ्ये अफगाणिस्ताविरुद्ध खेळताना फलंदाजीतही दम दाखवला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. नसीनेन शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर हे दोन षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 71व्या शतकानंतर भावूक झाली अनुष्का; प्रेम व्यक्त करत म्हणाली, ‘नेहमी तुझ्यासोबत’
‘किंग’ कोहलीचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत आजोबा, खाली झुकून केला मुजरा
विराटच्या 71व्या शतकानंतर भावूक झाली अनुष्का; प्रेम व्यक्त करत म्हणाली, ‘नेहमी तुझ्यासोबत’