मुंबई । ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टची गणना जगातील महान यष्टीरक्षक फलंदाजांमध्येही होते. तो आक्रमक फलंदाजी करण्यात माहीर होताच. शिवाय यष्टीपाठीमागे थांबून विजेच्या चपळापाई प्रमाणे यष्टिररक्षण करायचा. गिलख्रिस्टशिवाय इतरही जबरदस्त यष्टिरक्षक म्हणून उदयास आले. दरम्यान, गिलक्रिस्टने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचरला यापैकी सर्वोत्तम यष्टीरक्षक कोण आहे हे सांगितले.
गिलख्रिस्टने एका मुलाखतीत सांगितले की, ”धोनी वरील चौघांपैकी सर्वोत्कृष्ट असावा. माझे नाव गिली आहे, सिली नाही, मी एका अशा भारतीयाविषयी बोलत आहे ज्याचे बरेच भारतीय समर्थन करतात. पहिल्या क्रमांकावर धोनी असेन त्याच्या पाठोपाठ संगकारा आणि त्यानंतर मॅक्क्युलम असेल. यात शेवटी मार्क बाउचर असेल, कारण डोळ्याच्या दुखापतीमुळे तो जास्त खेळू शकला नाही.”
विकेटच्या मागे जास्तीत जास्त शिकार करण्याच्या बाबतीत धोनी गिलख्रस्ट आणि बाऊचरच्या मागे तिसर्या क्रमांकावर आहे. विकेटकीपिंग कौशल्याव्यतिरिक्त धोनीला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणूनही ओळखले जाते.
तो म्हणाला, ”त्याची कारकीर्द वाढताना पाहून छान वाटले. त्याच्या शतकासह, तो लोकांच्या नजरेत आला आणि लोकांना त्याची खेळण्याची शैली आवडली. त्याने ज्या प्रकारे स्वत: ला हाताळले ते अविश्वसनीय होते.”
धोनीने वन डे क्रिकेटमध्ये 50.83 च्या सरासरीने 10,773 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी -20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चँपियन्स करंडक विजेतेपद जिंकले आहेत.