---Advertisement---

LSG vs MI: हा ठरला लखनऊच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

On: शनिवार, एप्रिल 5, 2025 7:49 AM
---Advertisement---

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभावाचा सामना करावा लागला. या रोमांचक सामन्यात लखनऊ संघाने 12 धावांनी विजय मिळवला. या विजयासह रिषभ पंतच्या नेतृत्वात लखनऊचा हंगामातील दुसरा विजय ठरला.

टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना लखनऊने मिशेल मार्श (60) आणि एडेन मार्कराम (53) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 203 धावांचा टप्पा गाठला. मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार हार्दिक पांड्याची चेंडूतील हुशारी या सामन्यात दिसून आली, त्याने 5 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला त्यांच्या सलामी जोडीकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती, परंतु विल जॅक्सने 5 धावा काढून आपली विकेट गमावली आणि रायन रिकल्टन फक्त 10 धावा काढून बाद झाला. यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये मुंबई संघाने 86 धावांवर नमनच्या रूपात तिसरी विकेट गमावली, जो 46 धावा करून बाद झाला. यानंतर, फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा या सामन्यात अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही.

सूर्यकुमार यादव एका टोकाकडून फटकेबाजी करत होता. तो जोपर्यंत क्रीझवर होता तो सामना मुंबईच्या हातात होता. मात्र तो ही 67 धावांवर 16.1 षटकात बाद झाला. सूर्याचा विकेट सामन्याचा टर्निंग पाँईंट ठरला. त्याला आवेश खानने बाद केले. सूर्यकुमार यादव 43 चेंडूत 67 धावा करुन बाद झाला.

हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 28 धावांची खेळी निश्चितच केली पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकला नाही. लखनऊकडून दिग्वेश राठीने 4 षटकांत फक्त 21 धावा देत एक विकेट घेतली तर आवेश खान, शार्दुल ठाकूर आणि आकाश दीप यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---