---Advertisement---

गुवाहाटीत भारत साधणार विजयाची हॅट्ट्रीक! खेळपट्टीवर बॅटींगचा की बॉलिंग जोर, वाचा पिच रिपोर्ट

On: रविवार, जानेवारी 25, 2026 9:14 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील तिसरा सामना आज (रविवार, २५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत मालिकेतील विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याच्या आशेने, तर न्यूझीलंड पहिला विजय मिळवण्याच्या शोधात उतरेल. यामध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकत ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. यासाठी जाणून घेऊ गुवाहाटीची खेळपट्टी नक्की कोणाला साथ देईल.

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवरही धावांचा पाऊस पाहायला मिळेल, असे मागील काही सामन्यांत पाहायला मिळाले आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजांनी चांगल्याचा धावा कुटल्या आहेत. आता गुवाहाटीतही त्याची पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर सुरूवातील वेगवान गोलंदाजांना काही हालचाल मिळू शकते. नंतर जसजसा सामना पुढे जाईल तसे खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होत जाईल. सीमारेषा छोटी असल्याने चौकार-षटकारांचा पाऊस पडेल.

मधील काही षटकात फिरकीची जादू चालण्याची शक्यता आहे, मात्र सामना रात्रीचा असल्याने विकेट्स मिळण्याची शक्यता कमीच आहे. येथे लक्ष्याचा पाठलाग करण्याऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेईल यात काही मोठी गोष्ट नाही.

या मैदानावर भारताने ४ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना जिंकला, दोन गमावले आणि एका सामन्याचा निकालच लागला नाही. या मैदानावर आंतरराष्ट्रीय टी२०ची सर्वाधिक धावसंख्या ३ बाद २३७ राहिली आहे. ही धावसंख्या भारताने २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. तो सामना भारताने १६ धावांनी जिंकला होता. तसेच २०२३मध्ये भारत येथे शेवटचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. हा सामना मात्र ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने तेव्हा २२५ धावांचे लक्ष्य पार केले होते. तसेच या मैदानावर टी२० क्रिकेटची सर्वोत्तम धावसंख्या २९४ राहिली आहे.

या मालिकेवरून पुन्हा एकदा भारताचा टी२० संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग, दुसऱ्या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यांनी त्यांच्या फलंदाजीचा जबरदस्त फॉर्म दाखवला. गोलंदाजीतही सुरुवातीला विकेट्स घेत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी आपणही आगामी टी२० विश्वचषकासाठी सज्ज आहोत, याचे संकेत दिले आहे.

या मालिकेतील चौथा सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---