आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही आढवड्यांचा कालावधी बाकी आहे. चाहते विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एडम गिलक्रिस्ट याने विश्वचषकासाठी पाच खेळाडू निवडले आहेत, जे या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करू शकतात. या पाच जणांमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा समावेश आहे.
एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याने निवडलेल्या यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आहे. तिसऱ्या क्रमांकावर गिलक्रिस्टने भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला निवडले आहे. चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) आणि शेवटी पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याचा संधी दिली गेली आहे.
गिलक्रिस्ट म्हणाला डेविड वॉर्नर आक्रामक अंदाजात फलंदाजी करू शकतो आणि वरच्या फळीत येऊन महत्वाच्या धावाही करून देऊ शकतो. तो मागच्या विश्वचषकाप्रमाणेच पुन्हा एकदा प्रदर्शन करू शकतो. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. भारतीय अष्टपैलू हार्दिकविषयी बोलतान गिलक्रिस्ट म्हणाला की, तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रत्येक विभागात चांगले प्रदर्शन करत आहे. टी-20 विश्वचषकात देकील तो असेच प्रदर्शन पुन्हा एकदा करून दाखवेल.
अफगाणिस्तानचा माजी कर्णदार आणि दिग्गज फिरकीपटू राशिद खानला चौथ्या क्रमांकावर निवडले. राशिदचा उल्लेख करत तो म्हणाला की, तो प्रत्येक टी-20 सामन्यात फिट बोसतो. मागच्या एक दशकापासून तो सतत चांगले प्रदर्शन करत आला आहे. यादीत पाचव्या क्रमांकावर उपस्थित जोस बटलरविषयी बोलताना गिलक्रिस्ट म्हणाला की, त्याच्याकडे पावर आहे. बटलर परिस्थितीनुसार उत्कृष्ट प्रदर्शन करतो. दरम्यान, टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंतचा वेळ लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग: आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातून विराट-राहुलची एक्झिट! जाणून घ्या नेमके कारण
Asia Cup 2022: मेघना-शफालीच्या ‘शतकी’ भागीदारीने भारताचे मलेशियासमोर 182 धावांचे टारगेट