मुंबई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि ऑस्टेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट हे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक मानले जातात. यष्टी पाठीमागे थांबून सुरेख कामगिरी करत दिमाखात अनेक विश्वविक्रम नोंदवले. आपल्या कारकीर्दीत हवेत सुर मारुन अप्रतिम झेल घेतले.
डाव्या हाताने फलंदाजी करणारा गिलख्रिस्ट हा खेळाडू आक्रमक फलंदाज म्हणूनही ओळखला जात होता. भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांची गोलंदाजी आपल्या बॅटने फोडून काढली.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेट प्रकारात त्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली. तो 1999, 2003 आणि 2007 साली झालेल्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेत जगभरात अनेक यष्टिरक्षक पुढे आले. एमएस धोनी देखील दिलेला आदर्श मानतो.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार यष्टीरक्षक सरफराज अहमद याला एमएस धोनी आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्यातील सर्वोत्तम यष्टीरक्षक कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सरफराजने एमएस धोनीचे नाव सांगितले. तो म्हणाला, “मी धोनीला पाकिस्तानविरुद्ध आयसीसीच्या स्पर्धेत खेळताना खूप जवळून पाहिले आहे. त्याच्या यष्टिरक्षणाला तोड नाही.”
सरफराज अहमद रोहित विषय बोलताना म्हणाला, “रोहितची टायमिंग जबरदस्त आहे, पण कोहलीच सर्वोत्तम आहे.” सरफराज अहमदचे नुकतेच पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे तो संघाबाहेर फेकला गेला होता.
38 वर्षीय माजी कर्णधार एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे. जगभरातील अनेक युवा क्रिकेटपटू धोनीला आदर्श मानतात. एक यष्टिरक्षक म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. यष्टीकडे न पाहता फलंदाजाला धावबाद करण्याची त्याची क्षमता फॅन्स आणि विरोधी संघाला चकित करणारी आहे.
गिलख्रिस्टने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ( झेल- यष्टीचित मिळून) एकूण 905 खेळाडूंना बाद केले. तर एमएस धोनीने 829 खेळाडूंना बाद केले.