भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने होणाऱ्या या मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. सध्या ही प्रतिष्ठेची ट्रॉफी भारतीय संघाकडे आहे. त्याचवेळी भारतात येऊन ही मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियन संघासमोर असेल. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियन संघाला या मालिकेचा दावेदार म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला आपल्या मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी केली. असे असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची खरी परीक्षा भारतात होणार असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट याने या मालिकेविषयी बोलताना म्हटले,
“यावेळी होत असलेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे. हा संघ 2004 च्या ऑस्ट्रेलिया संघ सारखाच मजबूत वाटतो.”
ऑस्ट्रेलियाने अखेरच्या वेळी भारतात 2004 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर आजतागायत त्यांना भारतात कसोटी मालिका जिंकण्यात यश आले नाही.
चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर, तिसरा सामना 1 ते 5 मार्चला धरमशाला आणि चौथा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेविड वॉर्नर, ऍश्टन एगर, स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, लान्स मॉरिस.
(Adam Gilchrist Said Australia Favorite For Border Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज तोंडाने नाही, तर बॅटने बोलतोय; राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानंतर पुन्हा ठोकले शतक
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध