चेन्नई येथे सुरू झालेल्या आयपीएल २०२१ चा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने दोन विदेशी वेगवान गोलंदाजांना आपल्या ताफ्यात सामील करून घेत, गोलंदाजी आक्रमणाला मजबूत बनवण्याचे काम केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिलने व ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर-नाईल यांना मुंबईने कोट्यावधी रुपये देत २०२१ आयपीएलसाठी मोर्चेबांधणी सुरु केली.
मिलने खेळणार मुंबईसाठी
इंग्लंडचा तेज गोलंदाज ऍडम मिलने याच्यासाठी अनेक संघ बोली लावताना दिसले. केकेआर व राजस्थान रॉयल्सने बोलीचे सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला ३.२० कोटी रुपये देत आपल्या संघात सामील करून घेतले. मिलने यापूर्वी २०१९ आयपीएल मुंबई संघाचा भाग होता. मात्र, दुखापतीमुळे तो हंगामापूर्वी बाहेर पडला होता.
कुल्टर-नाईल पुन्हा घालणार मुंबईची जर्सी
मागील वर्षी मुंबई संघाने ८ कोटी रुपयात खरेदी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर-नाईल याला लिलावापूर्वी करारमुक्त केले होते. मात्र, पुन्हा एकदा या लिलावात त्यावर विश्वास दाखवत ५ कोटी रुपयांची रक्कम देत त्याला संघात सामील करून घेतले.