---Advertisement---

“ही तर आयपीएल कराराची परतफेड”, ऑस्ट्रेलियन खेळाडूने सोडलेल्या कॅचवर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित वनडे मालिकेतील पहिला सामना २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव करत विजयी आघाडी घेतली. मात्र सामन्यांतील दुसर्‍या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असतांना ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर एडम झाम्पाने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक सोपा झेल सोडला.

त्यावर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रॅड हॉगने “झाम्पा बहुतेक आयपीएल कराराची परतफेड करतो आहे”, असे मजेशीर ट्विट केले.

https://twitter.com/Brad_Hogg/status/1332247131097219072

सामन्याच्या दुसर्‍या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असतांना ७ वे षटक ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स टाकत होता. या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर विराट कोहलीने खेळलेला फटका त्याच्या बॅटची कडा घेऊन हवेत गेला, मात्र डीप फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या एडम झाम्पा तो झेल घेऊ शकला नाही. याच घटनेचा संदर्भ देत ब्रॅड हॉगने ते ट्विट केले.

आयपीएल २०२० मध्ये झाम्पा खेळला आरसीबीकडून

आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर एडम झाम्पाला करारबद्ध केले होते. हाच धागा जुळवत ब्रॅड हॉग गमतीने म्हणाला, “एडम झाम्पा विराट कोहलीचा झेल सोडून बहुधा आयपीएल कराराची परतफेड करतो आहे.”

एडम झाम्पाने भारतीय कर्णधाराचा हा सोडलेला मात्र ऑस्ट्रेलियन संघाला फार महागात पडला नाही. हा झेल सोडल्यानंतर काहीच वेळात विराट कोहली २१ धावांवर असतांना जोश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर ऍरोन फिंचच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत भारतीय संघाचा डाव ३०८ धावांवर रोखला आणि मालिकेतील पहिल्याच सामना ६६ धावांनी विजय मिळविला. एडम झाम्पा १० षटकांत ५४ धावा देत ४ बळी पटकावत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

मालिकेतील दुसरा सामना २९ नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

हेच ते ‘विराट’पर्व! रन-मशीनच्या २२ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनलाही टाकले मागे

फिंच-वॉर्नर जोडीचा दणका ! भारताविरुद्ध शतकी भागीदारी करत केला अनोखा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---