मुंबई । या वर्षाचा अखेर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी अॅडिलेड ओव्हलच्या ऑनसाइट हॉटेलचा उपयोग कसोटी सामन्यापूर्वी जैविक सुरक्षित बबल म्हणून केला जाईल.
क्रिकेट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी जाहीर केले की, इंग्लंडच्या दौर्यावरुन परतलेला संघ अॅडलेडमध्ये अलगिकरणात राहणार असून स्थानिक हंगामाची तयारी सुरू करेल. इंडियन प्रीमियर लीगचा भाग नसलेले खेळाडू व सहाय्यक कर्मचारी अॅडलेड ओव्हल येथे सराव करतील. ते अॅडलेड ओव्हलवर असलेल्या न्यू ओव्हल हॉटेलमध्ये थांबतील.
नेथन लिऑन म्हणाला, ‘मी भारतीय संघाची प्रतिक्षा करत आहे. ही मालिका ऍशेस इतकीच मोठी आहे. भारताकडे महान खेळाडू आहेत आणि हे एक मोठे आव्हान असेल.’
एका वृत्तानुसार, भारतीय संघ आणि आयपीएल खेळणार्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अलगीकरणाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया राज्य सरकारांशी चर्चा करीत आहे.
३ डिसेंबर २०२० ते १७ जानेवारी २०२१ दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत संघ ४ कसोटी व ३ वनडे सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे.