सध्या भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड येथे आहे. सलग दुसऱ्या सायकलमध्ये भारतीय संघ या स्पर्धेची अंतिम फेरी खेळेल. तत्पूर्वी नुकताच भारतीय संघाचा किट स्पॉन्सर म्हणून करार केलेल्या अदिदास कंपनीने भारतीय संघाच्या तीनही प्रकारच्या संघासाठी नवी जर्सी लॉन्च केली आहे. अदिदास इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती दिली.
अनेक वर्ष भारतीय संघाला नाइकी ही अग्रगण्य किट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्पॉन्सर करत होती. त्यानंतर 2020 मध्ये एमपीएल स्पोर्ट्सने त्यांची जागा घेतली. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला एमपीएलने आपला करार मागे घेतला होता. त्याच्या जागी किलर जीन्सने काही काळ भारतीय संघाला स्पॉन्सर केले. यानंतर अदिदासने 2027 पर्यंत नवा करार केला आहे.
https://www.instagram.com/reel/Cs8sJjTIPf0/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
अदिदासने लॉन्च केलेल्या या जर्सीमध्ये भारतीय संघाची कसोटी जर्सी पांढऱ्या रंगाची असून, त्यामध्ये खांद्यावर तीन निळ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या दिसून येतात. भारतीय वनडे संघाची जर्सी हलक्या निळ्या रंगाची असून त्यावरही तीन आडव्या पट्ट्या दिसून येतात. तर छातीवर एक वेगळी डिझाईन दिसून येते. टी20 संघाची जर्सी बिना कॉलरची असून, त्यामध्ये अशोक चक्रातील आर्यन प्रमाणे छातीवर डिझाईन दिसून येते. या तिन्ही जर्सीवर छातीवर इंडिया अशी अक्षरे लिहिली आहेत.
भारतीय संघ सात जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. या सामन्यात भारतीय संघ प्रथम कसोटी जर्सी वापरलेल्या दिसेल. तर, त्यानंतर होणाऱ्या वेस्टइंडीज दौऱ्यावर भारतीय संघाच्या वनडे व टी20 जर्सी यांचे दर्शन होईल.
(Adidas India Launch New Jersey For Indian Cricket Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’